Marmik
Hingoli live News लाइफ स्टाइल

कावड यात्रेचे कळमनुरी येथून हिंगोली कडे प्रस्थान; लाखोंचा जनसमुदाय उपस्थित

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार संतोष (दादा) बांगर यांची बहुचर्चित कावड यात्रा 28 ऑगस्ट रोजी चिंचाळेश्वर महादेव मंदिर येथून सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हिंगोलीकडे निघाली आहे. कावड यात्रेत लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांची कावड यात्रा प्रत्येक श्रावण महिन्यात निघते. सदरील कावड यात्रा कळमनुरी तालुक्यातील चिंचाळेश्वर महादेव मंदिर येथून हिंगोली येथील कयाधू अमृतधारा महादेव मंदिर येथे येते.

या कावड यात्रेसाठी मागील दीड ते दोन महिन्यांपासून नियोजन केले जात असून कावड यात्रेस कालीचरण पुत्र कालिदास महाराज, हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर भावी हिंगोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्रीराम बांगर हे उपस्थित आहेत.

या कावड यात्रेत जिल्हाभरातील शिवभक्त, शिवप्रेमी आणि आमदार संतोष (दादा) बांगर चाहते व शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक लाखोच्या संख्येने सहभागी झाले आहेत.

27 ऑगस्ट रोजी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने घेण्यात आली.

या सभेत उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी रामलीला मैदान गच्च भरले होते. त्यामुळे आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या कावड यात्रेस नागरिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात हजेरी राहणार नाही, अशी शक्यता व समज अनेकांनी करून घेतला होता.

मात्र त्यांचा समज आणि शक्यता धुळीस मिळाली असून लाखोंच्या संख्येने नागरिक आणि शिवभक्त, शिवप्रेमी कळमनुरीचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या कावड यात्रेत सहभागी झाले आहेत. लाखोंच्या संख्येने ही कावड यात्रा कळमनुरी येथून हिंगोली कडे रवाना झाली आहे.

Related posts

असोला खून खटल्यातील आरोपीस जन्मठेप! अप्पर सत्र न्यायालय वसमत यांचा निकाल

Gajanan Jogdand

पोळा सण : वाई गोरखनाथ मार्गावरील वसमत – औंढा नागनाथ रोड वरील वाहतुकीत बदल

Gajanan Jogdand

उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी घेतला पंचायत विभागाचा अतिरिक्त कारभार, प्रलंबित कामांचा निपटारा

Santosh Awchar

Leave a Comment