Marmik
Hingoli live

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे निमित्त हिंगोली येथे धनगर समाजाची बैठक

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशात भारत जोडो यात्रा काढली आहे. 12 नोव्हेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात येणार आहे.

त्या निमित्त धनगर समाजाच्या वतीने खा. राहुल गांधी यांच्या पार्डी मोड ता. कळमनुरी येथे सत्कार करून धनगर समाजाला अनुसूचित जमाती (S.T.) आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.

त्या निमित्त 4 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे धनगर समाजाची बैठक पार पडली. यावेळी ॲड.बाबा नाईक, ॲड. सचिन नाईक, किशनराव मस्के, भास्करराव पंडागळे, ॲड.रवी शिंदे, दिनकर कोळेकर, शशिकांत वडकुते, भास्करराव बेंगाळ, अशोकराव मस्के, पंढरीनाथ ढाले, भास्करराव पोले, प्रा.साहेबराव देवकते, प्रा. तुकाराम साठे,सतीश तांबारे, प्रदीप मस्के, केशवराव नाईक चिंचोलीकर, भगवान पंडागळे, कान्हा कोकरे, केशव मस्के, पंकज होडबे, पहेलवान स्वप्नील पोले,पहेलवान बालाजी नरोटे, वामनराव पोले, पंजाबराव वडकुते, ॲड. दिलीपराव नाईक, प्रभू वडकुते, अशोक थिटे, अभय कुंडगीर, गजानन मस्के, दिपक डुरके,प्रा. ब्रह्मानंद नाईक, साहेबराव मस्के, आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते.

Related posts

पत्रकार बबन सुतार यांना पितृशोक

Gajanan Jogdand

अल्प पावसावर पेरण्या; शेतकऱ्यांचे बियाणे ‘मातीत’!

Gajanan Jogdand

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत “हर घर झेंडा” उपक्रम

Santosh Awchar

Leave a Comment