मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – 06 मार्च रोजी होळी व दि. 07 मार्च रोजी धुलिवंदन हे सण साजरे केले जाणार असुन सदर सण व उत्सव शांततेत पार पाडणे करिता हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. त्या संबंधाने पोलीस अधीक्षक यांनी सर्व ठाणेदारांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सुचना दिलेल्या आहेत.
होळी व धुलिवंदन करिता बंदोबस्त 01 अपर पोलीस अधीक्षक, 01 उपविभागीय पोलीस अधिकारी, – पोनी/सपोनि/पोउपनी असे 57 पोलीस अधिकारी, 453 पोलीस अंमलदार, 02 RCP पथक, 02 ATB पथक, 01 BDDS पथ, 02 SRPF प्लाटून, 600 होमगार्ड असा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.
जिल्ह्यात सर्वच शहरात व गावात पोलीस बंदोबस्त व पोलीस वाहनातून सतत पेट्रोलिंग असणार आहे. महत्वाचे व संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमला जाणार आहे.
सदर सण -उत्सव संबंधाने मोठया प्रमाणात उपद्रवी गुन्हेगार व्यक्ती विरोधात प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. अवैध दारू वाहतूक व विक्रीवर कार्यवाही करिता LCB व प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष पथक स्थापन केलेले असुन त्याद्वारे कडक कार्यवाही केली जाणार आहे.
सदर सण -उत्सव संबंधाने समाज कंटकांच्या हालचालीवर व सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक सायबर सेल येथे स्थापन केले असुन सदर पथकाचे या संबंधाने विशेष लक्ष असणार आहे. दारू पिऊन कोणीही वाहने चालवू नये, सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष नाकाबंदी करून सदर काळात प्रत्येक वाहणाची तपासणी करून ड्रॅंकन ड्राइव्ह च्या केसेस केल्या जाणार आहेत.
सर्व नागरिकांनी होळी व धुलिवंदन सण अतिशय आनंदात व शांततेत व सर्व नियमांचे पालन करून रंगाचा बेरंग न होता व आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन साजरे करावे असे आवाहन करण्यात आले आहे.