मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छञपती संभाजीनगर – जितो महिला शाखा छत्रपती संभाजीनगर च्या अध्यक्षा डिंपल पगारीया यांची नुकतीच जितो महाराष्ट्र महिला विग च्या अध्यक्ष पदी आगामी 2 वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षाच्या अध्यक्ष पदाच्या आपल्या उल्लेखनीय सामाजिक धार्मिक व बहु उपयोगी उपक्रमाचे यशस्वी आयोजना च्या पार्श्वभुभिवर त्यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीचे सर्वञ अभिनंदन होत आहे. निवड होताच संभाजीनगरात भविष्यात मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यक्रम व पर्यावरण व हितपयोगी उपक्रम व महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यानी व्यक्त केला