Marmik
Hingoli live News

जि. प. गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 1 व 2 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा, हिंगोली जिल्ह्याची निवड केलेल्या उमेदवारांना इतर जिल्ह्यात द्यावी लागणार परीक्षा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. 01/2023, दि. 5 ऑगस्ट, 2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्याची निवड केलेल्या उमेदवारांना इतर जिल्ह्यात जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. इतर जिल्ह्यात जाऊन परीक्षा द्यायचीच होती तर मग हिंगोली जिल्ह्याचे ऑप्शन ठेवलेच कशाला असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.

या जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पदाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. कनिष्ठ आरेखक या पदाची ऑनलाईन परीक्षा दि. 01 नोव्हेंबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 3 मध्ये ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णुपुरी गेट क्र. 18 व 22, नांदेड येथे होणार असून रिपोर्टींग टाईम दुपारी 3.00 वाजता आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेचे पदभरती जाहिरातीमध्ये नमूद नसलेले परंतु दिनांक 01 नोव्हेंबर, 2023 व  दि. 02 नोव्हेंबर, 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या परिक्षेकरिता हिंगोली परीक्षा केंद्र निवड केलेल्या उमेदवारांना इतर जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र देण्यात आलेल्या परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

कनिष्ठ यांत्रिकी या पदाची ऑनलाईन परीक्षा दि. 01 नोव्हेंबर, 2023 रोजी ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णुपुरी गेट क्र. 18 व 22, नांदेड येथे शिफ्ट क्र. 1 मध्ये होणार असून रिपोर्टींग टाईम सकाळी 7.00 वाजता आहे.

विस्तार अधिकारी (शिक्षण) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या परीक्षा दि. 2 नोव्हेंबर, 2023 रोजी गिरीराज एंटरप्रायजेस अमरावती, तिसरा मजला, बी-3 विंग, ड्रिमलँड बिझनेस पार्क, पंजाब नॅशनल बँकेच्या वर, नागपूर रोड, अमरावती या केंद्रावर होणार आहे.

यामध्ये विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदाची परीक्षा शिफ्ट क्र. 1 मध्ये होणार असून या परिक्षेचे रिपोर्टींग टाईम सकाळी 7.00 वाजता आहे. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची परीक्षा शिफ्ट क्र. 2 मध्ये होणार असून रिपोर्टींग टाईम सकाळी 11.00 वाजता आहे. 

वरील सर्व पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषद हिंगोलीच्या www.zphingoli.in व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उमेदवारांना या लिंकद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेता येतील.

उमेदवारांच्या माहितीसाठी मराठी व इंग्रजी भाषेतील माहिती पुस्तिका www.zphingoli.in व www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावेत.

तसेच ऑनलाईन परिक्षेकरिता उमेदवारांनी त्यांच्या परिक्षेच्या रिपोर्टींग वेळेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे सक्त पालन करणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवारांनी कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स अथवा डिजिटल उपकरणे सोबत आणण्यास सक्त मनाई आहे. या परिक्षेदरम्यान उमेदवारांने कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार केल्यास त्यांना त्याच क्षणी जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षांसाठी अपात्र ठरवून त्यांचे विरुध्द पोलीस गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे.

जाहिरातीतील नमूद केलेल्या उर्वरित इतर पदाच्या ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल.उपरोक्त सर्व नमूद बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

Related posts

लाच घेताना खाजगी इसमासह वसमत भूमापक चतुर्भुज! जमिनीची मोजणी करण्यासाठी स्वीकारले 50 हजार रुपये

Gajanan Jogdand

कळमनुरी तहसीलदारांच्या विरोधात निराधार अपंग महिलांचे बेमुदत अमरण उपोषण ! कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आश्वासन

Gajanan Jogdand

संभाजी पल्लेवाड व जाधव यांना महावितरण कर्मचाऱ्यांकडून निरोप

Gajanan Jogdand

Leave a Comment