Marmik
Hingoli live

लखन शिंदे मित्र मंडळाच्या वतीने श्रींच्या पालखीतील भाविकांना फळ वाटप

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – विदर्भातील श्रींची पालखी विठ्ठलाच्या भेटीसाठी मराठवाड्यातून मार्गस्थ होत आहे. या मार्गातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा फाटा येथे लखन शिंदे मित्र मंडळाच्या वतीने श्रींच्या पालखीतील भाविकांना फळ वाटप करण्यात आले.

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या शेगावीच्या श्रीगजानन महाराजांची पालखी 5 जून रोजी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथे टाळ – मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात दाखल झाली. ही पालखी 5 जून रोजी सेनगाव येथे मुक्कामी होती.

6 जून रोजी सकाळीच सेनगाव येथून ही पालखी विठ्ठलाचा गजर करत व टाळ – मृदुंगाच्या निनादात पुढे निघाली दिग्रस कराळे येथे सायंकाळी या पालखीचे आगमन झाले. दिग्रस कराळे येथे ही पालखी मुक्कामी होती.

आज 7 जून रोजी ही पालखी विठ्ठलाच्या भेटीसाठी पहाटे मार्गस्थ झाली. मार्गावरील बोरजा फाटा येथे लखन शिंदे मित्र मंडळाच्या वतीने पालखीतील भाविकांना व वारकऱ्यांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने लखन शिंदे मित्र मंडळ पदाधिकारी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

श्रींच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.

Related posts

सिद्धेश्वर आयुष्यमान आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियांसह औषधोपचारांची ही वाणवा

Gajanan Jogdand

वसमत येथे सापडला शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा, पोलिसांची धडक कार्यवाही

Santosh Awchar

वारंगा वन पर्यटन येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम साजरा

Gajanan Jogdand

Leave a Comment