Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

जैन मंदिरात हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात वान म्हणून तुळसींच्या रोपांचे वाटप; घरोघरी वृक्षारोपण करण्यासाठी प्रगती महिला मंडळचा उपक्रम

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-

छञपती संभाजीनगर – १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर, एन -९, एल सेक्टर, सिडको, संभाजी नगर, अंतर्गत प्रगती महिला मंडळ तर्फे प्रभू श्रीराम आगमनाच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. याला भरघोस असा प्रतिसाद मिळाला होता.

प्रमुख पाहुणे म्हणुन वंदना भुमकर, निर्मलाताई वायकोस, विद्या कटके, भारती संगवे, मिनाक्षी उदगिरकर या लाभल्या. कार्यक्रमाची सुरुवात णमोकार मंत्रानी केली, तसेच पल्लवी वायकोस शुभांगी वायकोस यांनी नृत्य सादर केले.

श्रीराम व लक्ष्मण यांचे शबरीच्या झोपडीत आगमन होऊन शबरीने त्यांना खाऊ घातलेली उटी बोरे यांचा सजीव देखावा… नमन वायकोस, अनुज जमालपुर व विशुद्धी धोंगडे या बाल कलाकारांनी खूप सुंदर रितीने सादर केला. कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मेघा पाटणी, द्वितीय क्रमांक पुजा काळे, तृतीय क्रमांक रत्नमाला अन्नदाते यांनी पटकावला.

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वान म्हणून तुळसींच्या रोपांचे वाटप करून घरोघरी वृक्षारोपण करण्यासाठी प्रगती महिला मंडळच्या अधक्षा सविताताई गोसावी, अरुणाताई संगवे, लता महाजन, मंजु सिंगलकर, शुभांगी एखंडे, शैलेजा सांगोले, संजिवनी बाळशेटे, संगीता बाळशेटे, सिमा वायकोस, प्रविणा अन्नदाते, दिपा दलाल, सारीका दलाल, आशा दलाल या सर्वांनी, या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात आमदार प्रदीप जैस्वाल ही उपस्थिती होती.

त्यांचे स्वागत मंदिरचे विश्वस्त अध्यक्ष आबा क्षीरसागर, अमोलजी मोगले, प्रकाशजी भाकरे, बाहुबली धोंगडे, नीलेशजी सावळकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मोगले, मीनाताई आहेरकर, सारीका डिकेकर यांनी केले.

सर्व उपस्थितानीं गरम गरम पोह्याचा स्वाद घेतला. कार्यक्रमाचा समारोप करून आभार प्रदर्शन मीनाताई आहेरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विश्वस्त, महिला मंडळ आदी सर्व कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

Related posts

सात दशकानंतर आचार्य महाश्रमण यांचे शहरात आगमन, 7 ते 11 मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Gajanan Jogdand

11 डिसेंबर रोजी विभागीय लोकशाही दिन

Gajanan Jogdand

पी. यु. जैन यांची जयंती उत्साहात

Gajanan Jogdand

Leave a Comment