Marmik
क्रीडा

राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली –  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली व हिंगोली जिल्हा हौशी पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 17 वर्षाखालील मुले व मुलीच्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा येथील लोकमान्य कनिष्ठ विद्यालयाच्या प्राचार्या सौ. मिनी थोपटे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, हौशी व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय ठाकरे, पत्रकार कल्याण देशमुख, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू आशितोष, शुटींग आंतरराष्ट्रीय खेळाडू नितीन चव्हाण उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत पूर येथील चिमुकल्या वारकरी सांम्प्रदायिक भजन मंडळी यांनी टाळ व मृदंगांच्या स्वरात केले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती, कोल्हापूर, नागपूर, पुणे, मुंबई, लातूर, औरंगाबाद, नाशिक या आठ विभागातील मुला-मुलींनी सहभाग नोंदविला असून सामने हे चुरशीचे होत आहेत. या स्पर्धेदरम्यान उपांत्य फेरीच्या सामन्यास रंणजीत मुटकुळे यांनी भेट दिली. दि. 12 फेब्रुवारी रोजी अंतिम सामने होणार आहेत.

या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी पंच म्हणून जमील शेख, रवी धोतरे, संजय नाकोडे, शेख अफसर, शेख वहीद, प्रभाकर काळबांडे, रावसाहेब गेडाफळे, हनुमंत सावंत, विजय जाधव, बालाजी नरोटे हे काम पाहत आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी,  क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, आनंदा सुरेकर, वसीम शेख, गजानन आडे, ममता महाजन, अर्जुन पवार, चांदु मुळे, आदी परिश्रम घेत आहेत.

Related posts

22 व्या हिंगोली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते बक्षीस वितरण

Gajanan Jogdand

राज्यस्तरीय ताइक्वांदो स्पर्धेसाठी पार्थ बियाणी, क्रीडा शिक्षक नवनाथ बांगर जळगावला रवाना

Santosh Awchar

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विद्यानिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

Gajanan Jogdand

Leave a Comment