Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar Hingoli live

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची २२ जानेवारी रोजी बैठक

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – विभागीय आयुक्त तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष  मधुकरराजे अर्डड यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक २२ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समूळ निर्मुलन करण्यासाठी शासन, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक ०४ जानेवारी, 2011 अन्वये विभागीय स्तरावरील भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आली आहे. विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणा-या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी समितीकडून ऐकून घेण्यात येतात तसेच लेखी स्वरूपातील तक्रारी स्विकारण्यात येतात. विशिष्ट अभिकथनाबाबत स्वतंत्र्यपणे स्थानिक चौकशी करण्याच्या दृष्टीने तजवीजही करण्यात येते.

विभागीय आयुक्त विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष आहेत. पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, विशेष पोलीस महानिरिक्षक, छत्रपती संभाजीनगर, विशेष पोलीस महानिरिक्षक, नांदेड, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड,

मुख्य वनसंरक्षक वनवृत्त छत्रपती संभाजीनगर, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर, विभागीय कृषि सहसंचालक छत्रपती संभाजीनगर, विभागीय कृषि सहसंचालक लातूर, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर,  विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर, उपायुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव, विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती, छत्रपती संभाजीनगर आदी विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शासकीय सदस्य आहेत.

Related posts

‘जिथे कमी तिथे आम्ही’ उपक्रमांतर्गत 18 जूनला गुणगौरव सोहळा

Santosh Awchar

ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनाचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Santosh Awchar

22 मे ला होणार सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतीची निवड; अनेक जण इच्छुक

Gajanan Jogdand

Leave a Comment