Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

11 डिसेंबर रोजी विभागीय लोकशाही दिन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी  11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-1 (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-1 (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे.  

विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात.

तसेच ज्यांनी यापुर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यांचे प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही. 

जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनांत तक्रारदाराचे समाधान झाले नाही, असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

Related posts

अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दांपत्यासह तिघांना अटक

Gajanan Jogdand

जैन समाजातील गुणवंत विद्यार्थी व मंदिराच्या माजी अध्यक्ष, सचिव विश्वस्तांचा सत्कार

Gajanan Jogdand

‘नमो रमो नवरात्री’ उत्सवामुळे डोंबिवलीत उत्साहाचे वातावरण

Gajanan Jogdand

Leave a Comment