Marmik
Hingoli live News

भांग पिऊन विभागीय वन अधिकारी कार्यालय करतेय काम!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयाचा कारभार विविध विषयांमुळे चव्हाट्यावर येऊ लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हे कार्यालय काही नशा पाणी करून काम करते की काय, अशी शंका येऊ लागली आहे.

हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली औंढा नागनाथ परिक्षेत्रात 2010 पासून किती पवळी निर्माण झाल्या?, त्यावरील खर्च, वनहक्क, वन संरक्षण समित्या कुठे कुठे स्थापन झाल्या. तसेच तालुक्यातील वनपरिक्षेत्रात किती अतिक्रमण झाले व त्यावर काय कार्यवाही केली याबाबतची माहिती मागविण्यात आली होती. मात्र, सदरील माहिती वन विभागाकडून देण्यात आली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांकडे 10 ऑक्टोबर 2023 रोजी दुसरे अपील केले असता व त्यात मागविलेल्या माहिती संदर्भात विभागीय वन अधिकारी कार्यालयाकडून काहीही एक कळविले नसल्याचे नमूद करण्यात आले होते. माहितीच्या अधिकारावर पोस्टाचे रीतसर तिकीट लावण्यात आलेले होते.

मात्र सदरील माहिती अधिकारावर कोर्ट फी तिकीट लावले नसल्याचे वन अधिकारी कार्यालयाकडून कळवून सदरील अर्ज निकाली काढण्यात आला.

तसेच निर्धारित वेळेत माहिती देणे बंधनकारक असताना ती न देता पहिल्या अपिलाची तारीख टाकून जा. क्र. 234 / 2023 दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी असे असलेला अर्ज ज्याचा ट्रॅक कन्साईनमेंट नंबर rm7924755in असा आहे पाठवून दिला.

सदरील ट्रॅक कन्साईडमेंट असलेला हा अर्ज 27 ऑक्टोबर रोजी पोस्टात रजिस्टर झाला आणि 28 ऑक्टोबर रोजी तो संबंधितांना पोहोचता झाला. यामध्ये तारखा वेगवेगळ्या असून काय कळवायचे म्हणून ही तसदी वन विभागाने घेतली. वेगवेगळ्या तारखांमुळे अर्जदार संभ्रमित झाला. वन विभागाने हा प्रताप केल्यानंतरही वन विभागाचा कारभार काही रुळावर येताना दिसत नाही.

वसमत तालुक्यात चंदनाची तस्करी केली जाते तर हिंगोली जिल्ह्यात पर जिल्ह्यातून विविध झाडांची लाकडे आणली जात आहेत. सदरील लाकडेही आरा मशीन व्यवसायिकांची असल्याचे समजते.

भरारी पथके काय करत आहेत हेही कळण्यास मार्ग नाही. केवळ नावापुरते आणि पदापुरतेच काही वनपरिक्षेत्राधिकारी असल्याचे दिसते. मागील कित्येक दिवसांपासून मात्र एकही कार्यवाही त्यांच्याकडून झालेली नाही.

याबाबत विभागीय वन अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनीही दोन्ही ठिकाणची लाकडे वैध आहेत व त्यांवर वैधतेची निशाणी hammer mark आहेत व ते संबंधीत ठिकाणांहून रितसर परवानगी घेऊनच आणलेली आहेत, असे सांगितले.

Related posts

सेवा पंधरवाडानिमित्त मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातयुवती सक्षमीकरण कार्यक्रम

Santosh Awchar

Hingoli पारोळा धबधबा ओसंडून वाहू लागला; पर्यटकांची गर्दी

Santosh Awchar

11 सोशल मीडिया धारकावर सायबर सेल ची कारवाई; आक्षेपार्य मजकूर केला पोस्ट

Santosh Awchar

Leave a Comment