Marmik
Hingoli live Love हिंगोली

पैशांची चिंता, जातीचा न्यूनगंड बाळगू नका, कोणत्याही क्षेत्रात जा पण टॉप करा – प्रा. बालाजीराव थोटवे

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – देशात सर्वच क्षेत्रात मागासलेला समाज मातंग समाजाची ओळख आहे. समाजातील मुले आत्ता कुठे शिक्षण घेत आहेत. या मुलांनी दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केल्यानंतर त्यांनी इथेच न थांबता पुढे शिक्षण घेत प्रत्येक क्षेत्र काबीज केले पाहिजे. यासाठी त्यांनी पैशाची चिंता करू नये. तसेच जातीचा न्यूनगंड ही बाळगू नये हिंगोली येथील सकल मातंग समाज आणि वस्ताद लहुजी साळवे कर्मचारी महासंघ त्यांना कोणतीच अडचण भासू देणार नाही; मात्र या विद्यार्थ्यांनी क्षेत्र कोणतेही असो टॉप केले पाहिजे, असे प्रतिपादन थोर विचारवंत प्राध्यापक बालाजीराव थोरवे यांनी केले.

हिंगोली येथील सकल मातंग समाज प्रणित ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 18 जून रोजी कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीनंतर पुढे काय? या विषयावर थोर विचारवंत प्राध्यापक बालाजीराव थोटवे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. डी. आर. मस्के हे उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगोली येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर अमोल धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बबनराव शिखरे, आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार सोनुने, युवा उद्योजक हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त इंजी. सचिन आठवले, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सुशीला आठवले आदींची विचार मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक बालाजीराव थोटवे म्हणाले की, तुम्ही शिकून मोठे व्हा; मात्र पैसा कमवतांनाच आपली नाळ समाजाची राहू द्या. शिक्षण घेऊन चांगला माणूस बना!

सध्या जातीतील कौशल्य शिकविण्याची ही शिक्षणाची नव्या प्रणालीत आपण आपला मातंग समाज कुठे आहे हे प्रस्थापितांना विचारा. ही शिक्षण प्रणाली चुकीची आहे. या विरोधात जाब विचारा, तुम्ही मुक्ता साळवे सारखे झाला पाहिजेत. वैद्यकीय क्षेत्र, इंजिनीयर यामध्ये उत्तम गुण मिळवा. यात नाहीच जमले तर तुम्ही उत्तम कवी व्हा, लेखक व्हा, चिकित्सक व्हा, शासकीय सेवेत जा, जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणारे व्हा. हे सर्व करताना पैशाची चिंता करू नका, सकल मातंग समाज तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे.

तसेच मी मातंग जातीचा आहे म्हणून न्यूनगंड देखील बाळगू नका. कोणत्याही क्षेत्रात जा; मात्र टॉप करा, असे प्रतिपादन थोर विचारवंत प्राध्यापक बालाजीराव थोटवे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

कार्यक्रमात हिंगोली येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर अमोल धुमाळ, युवा उद्योजक हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त इंजिनीयर सचिन आठवले यांनीही विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व राजस बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली संस्थापक सचिव सुमित कांबळे यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विठ्ठल रुखमाई सेवाभावी संस्था हिंगोलीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रवी थोरात यांच्या तर्फे सर्वात जास्त गुण मिळवण्याऱ्या दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1001 रु. रोख पारितोषिक देण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम गायकवाड यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तर मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलकुमार खंदारे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य व्यवस्थापक तथा संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव संतोष अवचार विजय सोनवणे, दिलीप ढोके, जय घोडे, संदीप गायकवाड, हिरामण ढोके, अक्षय डाखोरे, नारायण सोनटक्के, सुशील कसबे, प्रताप भुजवणे, पवन खरात, गंगाधर खंदारे, आकाश सोनटक्के, माधव तलवारे, संतोष साबळे, सोपानराव पाटोडे, भानुदास खंदारे, सुदाम गवळी, राजू ससाणे, सुधीर आठवले, शेषराव चव्हाण या कार्यकर्त्यांनी भगीरथ प्रयत्न केले.

Related posts

‘हिंगोली भूषण’ नायशा अन्सारी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र

Santosh Awchar

हिंगोलीत पोलिसांच्या आशीर्वादाने सर्व काही अलबेल; पोलीस घेत आहेत हप्ते

admin

तिरंगा सायकल राईडचा शुभारंभ

Santosh Awchar

Leave a Comment