मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जागा सर्वे नं. 90 सिटी सर्वे नं. 3566 मधून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष, विकासशील, लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्राची ओळख जगाला करून देणारे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य समाजकारण व त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत केलेल्या कार्याची दखल घेत हिंगोली शहरात त्यांचा पुतळा उभा राहावा या हेतूने जिल्ह्यातील तमाम मातंग समाज भावनेचा आदर करून हिंगोली नगरपरिषद यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी ठराव घेतला.
मात्र संबंधित जागाही आरोग्य विभागाची असून सदरील जागेवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आज रोजी अतिक्रमण केलेला पुतळा उपस्थित आहे.
सदरील जागा आरोग्य विभागाचे असल्याने पुतळ्यासाठी आरोग्य विभागास आदेशित करून प्रस्ताव मागविण्यासाठी आदेशित करावे. तसेच ही जागा साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी हिंगोली नगर परिषदे यांना हस्तांतरित करण्यात यावी.
यासाठी आदेशित करावे, अशी मागणी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील कर्तव्यदक्ष, विकासशील, लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देताना महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, लहुजी शक्ती सेनेचे डॉ. रवी थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिक व मातंग समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी 2001 मध्ये लहुजी शक्ती सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात देखील सकारात्मक चर्चा आमदार संतोष (दादा) बांगर यांनी घडवून आणली.
त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांचे मातंग समाज बांधवांकडून तसेच लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.