Marmik
क्राईम

वारंगा फाटा येथून 33 हजार 750 रुपयांचा वाळलेला गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नवी आबादी वारंगा फाटा येथून 33 हजार 750 रुपयांचा वाढलेला गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वय आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने केली.

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध व शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा विक्री विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते.

या अनुषंगाने 18 एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाला आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, नवी आबादी वारंगा फाटा येथे इसम नामे यादव संभाजी भडंगे हा अवैधरीत्या गांजा बाळगून असून विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पंचासह दुपारी 3 वाजून 25 मिनिटा दरम्यान नमूद ठिकाणी सदरील इसमाच्या घरी गेल्या असता नमूद इसम घरी मिळून आला व पोलीस पथकाला त्याच्या ताब्यात विक्रीसाठी बाळगून असलेला व शासनाने प्रतिबंधित केलेला वाढलेला गांजा वजन 1.35 किलोग्रॅम (किंमत 33 हजार 750 रुपयां)चा मिळून आला.

त्यावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाणे येथे नमूद इसमाविरुद्ध 20 (ब)ii एन डी पी एस कायद्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, हरिभाऊ गुंजकर यांनी केली.

Related posts

सोयाबीन चोरणारी अट्टल गुन्हेगार टोळी जेरबंद; 1 लाख 5 हजार रुपयांच्या मुद्देमालासह 5 आरोपी ताब्यात

Santosh Awchar

पुसेगाव येथील आणखी दोघेजण दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

शेतातील मोटार पंप चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 1 लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

Leave a Comment