मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – महावीर डायग्नोस्टिक सेंटर छत्रपती संभाजीनगर व आय.आय.आर.डी मुंबई बांच्या तर्फे आज पत्रकार परिषदेत प्रास्ताविक करताना डॉ. सन्मती ठोळे यांनी सदर अभियानाबद्दल जनतेला माहिती मिळावी असा उद्देश असल्याचे सांगितले. सदर अभियान हे 12 व 13 जानेवारी रोजी दररोज सकाळी 9 ते 11, दुपारी 12 ते 2, संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नाव नोंदणीसाठी प्रत्यक्षात ठोले बाल रुग्णालय राजाबाजार येथे होत आहे. हे अभियान निशुल्क असल्याने सर्व जनतेने यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मानसिक, शारीरिक व अध्यात्मिक परिपूर्ण व्यक्ती असल्यास ती स्वस्थ आहे. आहार विहार व परिधानात अमूलाग्र बद्दल झाल्यामुळे शरीर व्याधीग्रस्त झाले आहे. यासाठी आपण मूळ कारणे शोधत आहोत. ते आहे पंचमहापूते यावर आम्ही अतिचार केल्यामुळे शरीर रोगट होत आहे.
यामध्ये आहार – इंग्रजाचे शासन आम्हाला मानसिक व शारीरिकरित्या गुलाम बनवून गेले आहे. जरी आम्ही स्वातंत्र्य झालो तरी मानसिक दृष्ट्या तरी आम्ही शारीरिक दृष्ट्याने कसे गुलाम झाले आहोत त्याचे उदाहरणे आहेत. आम्ही खात आहोत जंक फूड, प्रोसेस फूड अन्न आम्ही फ्रिज करून ठेवून उपयोगात आणतो. शितपेये नशेचे पदार्थ यांच्या सेवनामुळे शरीरात विषांचा अंश साचून राहतो. कालातरांने त्यांचे रूपांतर भयंकर आजारात होत असते.
विहार – पायी चालत होतो तेव्हा आपणास हलके वाटत होते. परंतू आपण आता सर्वजण दोन चाकी, चार चाकी हवाई मार्गे रेल्वे आदींच्या सवयींमुळे शरीरयष्टी काटक होती आता ती नाजूक होत चालली आहे.
परिधान – पायजमा, कुर्ती, टोपी, धोतर, कुर्ता, बंडी, पागाँटे, फेटा, लगोटीचा वापर आता कमी झाला आहे. आता आपण कोट, सूट, टाईट जिन्स, टी शर्ट वापर सुरू केला आहे. हवामानानुसार आपला परिधान घालावा असा आहे. दक्षिण भारतात आता सर्वजण लुंगी व साडीच परिधान करतात. कपडे कोट घातला तर एसी मध्ये राहावे लागते त्यामुळे विटमन्स डी ची कमी झाली आहे.
वैद्यकीय शिक्षण पध्दती, मॉडर्न मेडिसन शिकणाऱ्या वैद्यकीतज्ञास आजाराची मुळ कारणे माहिती मिळतेच असे नाही. औषधाची दुष्परिणामे इतकी जास्त आहे. हे आम्हाला पण माहिती नसते. आम्ही पण त्या औषधासोबतची चिठ्ठीवर पाहून आम्हाला माहिती होत आहे. म्हणूनच डॉ. ठोळे व डॉ. एस.आर. नारायणराव मुंबई हे प्रतिबध्द झाले आहेत की आम्हाला आता स्वस्थ समाजासाठी व जनतेचे कुठे चुकत आहे यासाठी काही चांगला उपाय आहे का यासाठी मेडिकल
डिटॉक्सिफिकेशन बद्दल पूर्ण माहिती देत आहे ते म्हणजे डॉ. एस. आर नारायणराव,यामध्ये प्रामुख्याने शुध्द हवा, पाणी शारीरिक कामात प्राणायम व अन्न सेवनांची विशिष्ट पध्दत यासाठी 400 पेक्षा जास्त कार्यशाळा झाले आहे. यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेऊन निरोगी झाले आहेत. ग्लोबल डिटॉक्सिफिकेशन सेंटर एलोरा व सध्या त्यांची शाखा आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू करत आहोत.
पत्रकार परिषदेत महावीर इंटरनॅशनलचे नवनियुक्त अध्यक्ष वीर महावीर पाटणी, मंत्री विर हर्षवर्धन जैन, कोषाध्यक्ष डॉ नंदलाल बोथरा, माजी अध्यक्ष वीर सतीश सुराणा, उद्योजक प्रमोदकुमार ठोलीया व प्रसिध्द फिजिशियन डॉ. प्रकाश कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती.