मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर हे एका असाहाय्य वयोवृद्ध व्यक्तीच्या मदतीस धावले त्यांच्या मदतीने सदरील व्यक्तीवर उपचार करून त्यास आज 22 ऑगस्ट रोजी ते काचीगुडा एक्सप्रेस ने त्याच्या गावी निजामाबाद तेलंगणा येथे पाठविण्यात आले.
दि.17 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यम. राकेश कलासागर कामानिमित्त नांदेड येथे जात असताना वसमत – मालेगाव रोडवर कडेला अत्यावस्त व अर्धनग्न अवस्थेत एक वयोवृद्ध व्यक्ती दिसली असता पोलीस अधिक्षक कलासागर यांनी आपली गाडी थांबवून आपले सहकारी यांना सुचना देऊन त्या व्यक्तीला रोडच्या कडेला आणून आस्थेने विचारपुस केली असता सदर व्यक्ती काहीही बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सदरची माहिती वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांना देऊन सदर इसमास उपचारासाठी घेऊन जाणेबाबत आदेशीत केले.
त्यानंतर सपोनि विलास चवळी यांनी आपले अधिनस्थ असलेले पोलीस अंमलदार पोलीस नाईक मधुकर आडे व चालक निलेश अवचार तसेच 108 रुग्णवाहिकेचे चालक गंगाधर जोगदंड, डॉ. पडोळे सह रुग्णवाहिका व पोलीस व्हॅन घेऊन घटनास्थळी गेले व सदर जखमी व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे दाखल केले.
त्यानंतर पोलीस अधीक्षक कलासागर व ग्रामीण पोलीस स्टेशन वसमतचे सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर व्यक्तीच्या मदतीला शिव विकास सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे संस्था अध्यक्ष गंगाधर सुभाषराव जोगदंड व त्यांचे सहकारी विश्वनाथ सुदाम भुजबळे, अनिल मुलगीर , अभिषेक वाघ,सिद्धार्थ इंगोले शिवाजी कोरडे यांनी सहकार्य केले. सदर जखमी इसमाला आंघोळ ई घालून स्वच्छ करून अंगात घालण्यासाठी नवीन कपडे देऊन दररोज जेवणाची व्यवस्था केली.
तसेच पोलिसांनी दररोज सदर व्यक्तीच्या तबेतीची आस्थेने विचारपूस करत होते. त्यानंतर आजरोजी सदर इसमाच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने सपोनि विलास चवळी,पोलीस अंमलदार साहेबराव चव्हाण,चालक आगलावे यांनी सरकारी दवाखाना वसमत येथे येऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सदर इसम तेलगू भाषिक असल्याने त्यास मराठी किंवा हिंदी बोलता येत नसल्याने वसमत येथील तेलगू भाषिक नागरिकाच्या मदतीने माहिती घेतली असता सदर ईसमाने त्याचे नाव भुमय्या तिमन्ना वय 60 वर्षे रा. निजामाबाद राज्य तेलंगणा असे सांगितले. त्यांचेबाबत अधिक माहिती घेऊन आज रोजी काचीगुडा एक्सप्रेसने निजामाबाद येथील रेल्वेचे तिकीट सोबत देऊन त्यास सुखरूप बसवुन त्यांचे गावी पाठवले आहे.
पोलीस अधीक्षक साहेबांच्या प्रसंगावधनामुळे तसेच वरील पोलीस, डॉक्टर व शिवविकास सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे सदस्य या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे सदर व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे. शिवविकास सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थाच्या माध्यमातून आतापर्यंत चार ते पाच लोकांना जीवदान मिळाले असल्याने त्यांचेही कौतुक होत आहे.