मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / सतीश खिल्लारे, पांडुरंग कोटकर, संतोष अवचार :-
सेनगाव / हिंगोली – सेनगाव तालुक्यातील कवठा येथील एका तरुणास सहज मज्जा म्हणून वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने तलवारीने केक कापताना चा फोटो काढून फेसबुक वर टाकला आणि हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने त्यास बेड्या ठोकल्या आहेत.
सेनगाव तालुक्यातील कवठा या गावातील वैजनाथ अर्जुन अंभोरे या युवकाने तलवारीने केक कापून फेसबुक वर फोटो टाकली होती.
सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या पोलीस पथकाला मिळाल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तात्काळ वैजनाथ अंभोरे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील तलवार जप्त करून शस्त्र कायदा कलम 4/25 प्रमाणे पोलीस स्टेशन सेनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सहज मजा म्हणून तलवारीने केक कापून फेसबुकवर फोटो टाकने या युवकास चांगलेच महागात पडले आहे. सर्व युवकांना सुचित करण्यात येते की, कोणीही रस्त्यावर तलवारीने केक कापू नये व अवैध शस्त्र बाळगू नये अन्यथा पोलिसामार्फत कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा हिंगोली पोलिसांनी दिला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन यांच्या पथकाने केली आहे.