Marmik
Hingoli live

सेनगाव तहसील कार्यालयावर सुशिक्षित बेरोजगार कृती समितीचे आंदोलन, कंत्राटी पद्धतीचे सरकारी नोकरी भरती व शासकीय शाळांचे खाजगीकरण बंद करण्याची मागणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – कंत्राटी पद्धतीने होणारी सरकारी नोकरी भरतीचा जीआर रद्द करावा तसेच महाराष्ट्र राज्याच्या 62000 सरकारी शाळेचे होणारे खाजगीकरण बंद करावे यासह इतर महत्त्वाच्या मागण्या संदर्भात सेनगाव येथील तहसील कार्यालयावर सुशिक्षित बेरोजगार कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

मागील कित्येक वर्षांपासून घरदार सोडून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. मानसिक ताण तणावांमध्ये जीवन जगत आहेत. त्यास सर्वस्वी जबाबदार सरकारचे धोरण आहे.

एक स्वप्न घेऊन रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या जीवाशी मायबाप सरकार खेळ खेळत आहे. स्पर्धा परीक्षा शुल्क अति प्रमाणात वाढवले गेले आहे. सरकारी पदही कंत्राट पद्धतीने भरवण्याचा शासकीय जीआर काढला आहे.

परीक्षा केंद्र ही 300 ते 350 किलोमीटर पर्यंत दूर टाकले जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे तान – तणावात जगत आहेत.

शासनाने कंत्राटी पद्धतीचे सरकारी नोकरी भरतीचा जीआर रद्द करावा. केजी टू पीजीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण द्यावे.

सरळ सेवा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एसटी व रेल्वेचा प्रवास मोफत करण्यात यावा. सरळ सेवा परीक्षासाठी आकारले जाणारे अवाजवी शुल्क बंद करून सरसकट सर्वांना परीक्षा शुल्क 100 रुपये आकारण्यात यावे.

महाराष्ट्र राज्याच्या 62 हजार सरकारी. शाळेचे होणारे खाजगीकरण रद्द करावे मुक्त विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे शुल्क कमी करण्यात यावे.

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराचे तातडीने चौकशी करून यापुढे परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात याव्यात.

स्पर्धा परीक्षा केंद्र हे जवळपास देण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही अशा विविध मागण्या करण्यात आल्या

Related posts

हिंगोली ते नांदेड महामार्गावरील भेंडेगाव पाटीवर रोडला आले तळ्याचे स्वरूप! दोन ते तीन फूट पडले खोल खड्डे!!

Santosh Awchar

वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम; रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहांतर्गत प्रभावी जनजागृती कार्यक्रम

Santosh Awchar

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

Santosh Awchar

Leave a Comment