मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील असोंदा, निशाणा, मेथा व लाख येथे मानव विकास व इतर कोणतीही एसटी बस सुरू नसल्याने या भागातील शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले होते.
सदरील प्रकार विद्यार्थ्यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष, विकासशील, लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांना सांगताच आमदार संतोष (दादा) बांगर यांनी आगार प्रमुखांना भ्रमणध्वनीवरून फोन करून सदरील भागात एसटी बस सुरू करण्याची सूचना केली आणि लगेच एसटी बस सुरू करण्यात आली. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असून या भागातील पालक आणि ग्रामस्थांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांचे आभार मानले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव, असोंदा, निशाणा, मेथा व लाख येथे मागील कित्येक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगाराकडून बस सेवा बंद करण्यात आली होती.
बस सेवा अभावी या भागातील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने हिंगोली येथे शिक्षणासाठी यावे लागत होते. खाजगी वाहनाचे ये – जा करण्याचा खर्च परवडत नव्हते.
पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गोरगरीब पालकांना पोटाला चिमटा लावून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता तर काही विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाता येत नव्हते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले होते.
अखेर या भागातील विद्यार्थी व पालकांनी 19 सप्टेंबर रोजी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष, विकासशील, लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांची भेट घेऊन त्यांना सदरील प्रकार सांगितला.
आमदार संतोष (दादा) बांगर यांनी भ्रमणध्वनीवरून हिंगोली आगार प्रमुख यांना फोन करून सदरील भागात बस सेवा सुरू करण्याबाबत सूचना केली.
आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या सूचनेवरून तात्काळ या भागात बस सेवा सुरू झाली. त्यामुळे या भागातील पालक व ग्रामस्थांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांचे आभार मानले आहेत.
यावेळी सह संपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, जि. प. समाजकल्याण सभापती फकिरराव मुंडे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, तालुकाप्रमुख धनंजय पाटील दातीकर, साहेबराव शिंदे, सुरेंद्र ढाले, राजू नागरे, शहरप्रमुख बबलू पत्की, सुधाकरराव गंगावणे,राजू पाटील कर्हाळे, स्वप्नील पोले, बालाजी नरोटे, सुरेश शिंदे, मयूर शिंदे, शिवराज पाटील, शुभम शिंदे, सचिन धांडे, बाळू डोरले, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर मुरकुटे, चिकू पाटील, ज्ञानेश्वर लोंढे,शंकर शिंदे,गंगाधर शिंदे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.