Marmik
Hingoli live

निवडणूक : जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत; कही खुशी कही गम

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार

हिंगोली – जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने 28 जुलै रोजी आरक्षणाची सोडत करण्यात आली. यावेळी अनेक जागा या आरक्षित झाल्याने तसेच काही प्रभाग हे महिलांसाठी सुटल्याने निवडणूकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसले. या आरक्षणानुसार आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केल्याचे दिसते.

28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात चिठ्ठ्या टाकून हे आरक्षण सोडत करण्यात आले. एका बालकाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आरक्षण सोडतीनंतर आरक्षित झाले जिल्हा परिषदेचे निर्वाचक विभाग पुढीलप्रमाणे – फाळेगाव अनुसूचित जमाती महिला, आडगाव सर्वसाधारण महिला, खेरडा सर्वसाधारण महिला, पेडगाव अनुसूचित जाती महिला, बासंबा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्ग महिला, बळसोंड नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, भांडेगाव अनुसूचित जाती, उमरा अनुसूचित जाती महिला, नरसी नामदेव अनुसूचित जमाती महिला, दिग्रस कराळे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, माळधामणी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, खरवड सर्वसाधारण महिला, वाकोडी सर्वसाधारण महिला, येळेगाव तुकाराम सर्वसाधारण महिला, कोंढुर अनुसूचित जमाती, नांदापूर अनुसूचित जाती महिला, सिंदगी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, पोत्रा सर्वसाधारण महिला, आखाडाबाळापुर नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, शेवाळा सर्वसाधारण महिला, वारंगा फाटा अनुसूचित जाती महिला, जवळा पांचाळ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, डोंगरकडा नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सवना अनुसूचित जमाती महिला, गोरेगाव सर्वसाधारण, बाभूळगाव नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, आजेगाव सर्वसाधारण महिला, पानकनेरगाव नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, जयपूर अनुसूचित जाती, वरुड चक्रपान अनुसूचित जाती, साखरा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, हत्ता सर्वसाधारण महिला, भानखेडा अनुसूचित जमाती, पुसेगाव नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, येहळेगाव सोळंके सर्वसाधारण, पिंपळदरी तर्फे नांदापुर सर्वसाधारण, जलालढाबा सर्वसाधारण महिला, दुघाळा अनुसूचित जमाती, सिद्धेश्वर सर्वसाधारण, अंजनवाडी सर्वसाधारण महिला, उखळी सर्वसाधारण, जवळाबाजार सर्वसाधारण, पुरजळ अनुसूचित जाती, शिरडशहापुर सर्वसाधारण महिला, पांगरा शिंदे सर्वसाधारण, पार्डी बु सर्वसाधारण, कुरुंदा सर्वसाधारण, गिरगाव सर्वसाधारण महिला, कवठा सर्वसाधारण, आंबा सर्वसाधारण, टेंभुर्णी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, करंजाळा अनुसूचित जाती महिला, हट्टा सर्वसाधारण, खांडेगाव सर्वसाधारण, हयात नगर सर्वसाधारण महिला, बाभूळगाव सर्वसाधारण, असेगाव सर्वसाधारण अशा पद्धतीने आरक्षणाची सोडत करण्यात आली आहे.

आरक्षण सोडत करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची उपस्थिती होती.

Related posts

जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरोग रुग्ण शोध मोहिम सुरू ; अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांचे निर्देश

Santosh Awchar

Hingoli खुनातील दोन आरोपींना जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Santosh Awchar

आयपीएलवर सट्टा ! औंढा नागनाथ, हयात नगर येथे कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment