मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे दि. 17 सप्टेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन समारंभास उपस्थित राहणार आहेत.
त्यांचा हिंगोली दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.रविवार, दि. 17 सप्टेंबर, 2023 रोजी पहाटे 5.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने समृध्दी महामार्गाने हिंगोलीकडे प्रयाण.
सकाळी 8.00 वाजता हिंगोली येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 9.00 वाजता देवडा नगर येथील नगर परिषदेच्या उद्यानात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन समारंभास उपस्थिती.
सकाळी 10.00 वाजता हिंगोली येथून माजलगाव जि. बीड कडे प्रयाण करतील.