मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – नेहमी सामाजिक व जनकल्याणकारी उपकम राबविणा-या खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबजार अंतर्गत जैन टॅग गु्रप तर्फे हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल प्रांगण आचार्य गुप्तीनंदी गुरूदेव सभागृह येथे गिनीज बुक वर्ल्ड असलेले भिलाई येथील डॉ.आशिष पाटणी यांचे ‘भविष्यम’ या विषयावर उदबोधन झाले.
या कार्यकमाचे प्रोजक्ट चेअरमेन स्वाती कासलीवाल, दिपाली पांडे, जयश्री लोहाडे, तसेच अध्यक्षा रिचा कासलीवाल, उपाध्यक्षा श्श्वेता कासलीवाल, सचिव पुजा झांजरी, कोषाध्यक्षा पुर्वा कासलीवाल, संस्थापिका अध्यक्षा अनुपमा दगडा दिपिका बडजाते ह्या होत्या.
कार्यकमाची सुरुवात कीती पाटनी चा मंगलाचरणाने करण्यात आली. प्रमुख अतिथी आशिष पाटनी यांचा परिचय स्वाती कासलीवाल ने केला अतिथीच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यकमाचे सुत्रसंचालन जैन टॅगच्या दिपाली पांडे केले.
यावेळी डॉ.आशिष पाटणी यांनी यावेळी आपले विचार मांडतांना सांगीतले की, वास्तुमधील वातावरण सकारात्मक करण्यासाठी विना खर्चीक व सर्वसाधारण टिप्स यावेळी दिल्या. ते म्हणाले की, नमोकार महामंत्रामधील न हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा उच्चार स्पष्टपणे केला पाहिजे.
रात्री झोपतांना १ ग्लास पाण्याचे भरुन ठेवावा. व ते पाणी सकाळी कुंडीतील झाडाला टाकावे, सकाळी उठल्यावर दोन्ही हात जोडुन त्यावर नमोकार मंत्र म्हणुन व आपल्या इष्ठदेवतेचे स्मरण करून दोन्ही हात आपल्या चेह-यावर फिरवावे. तसेच देवदर्शन करतांना मौन व्रत धरावे. झोपतांना पुर्व पश्श्चिम किंवा दक्षिणेस डोके करून झोपावे.
तसेच जपमाळा करतांना जपमाळा हि स्वतहाचिच वापरावी. घरामध्ये दानपेटी ठेवणे, व मुलांना दररोज त्यामध्ये क्वाईन टाकण्यास सांगणे, असे अनेक टिप्स यावेळी डॉ.आशिष पाटणी यांनी दिल्या.
कार्यकमासाठी मा.अतुलजी सावे, प्रदिप रौनक कुणाल ठोले, पुष्पादेवी शिखरचंद अजमेरा, संगीता राजकुमारजी पाटणी, राजेशजी मेहता यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यकमा प्रसंगी पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, पंचायत सचिव प्रकाश अजमेरा, माजी अध्यक्ष व विश्श्वस्थ ललीत पाटणी, किरण पहाडे, जितेंद्र पाटणी, यतीन ठोले, महावीर ठोले,
महावीर सेठी, प्रमोद पाटणी, यांच्यासह सकल जैन समाजाचे सदस्य उपस्थित होते. कार्यकम यशस्वी करण्यासाठी श्श्वेता सेठी, मोनिका चांदीवाल, डॉ.याशिका पांडे, छाया कासलीवाल, सिम्मी पहाडिया, रचना पहाडे, नेत्रजा कासलीवाल, मिताली काला, श्वेता गंगवाल, रानु सेठी, सिमा बडजाते, सारीका बडजाते, किर्ती पाटणी, रिना ठोले,उज्वला पाटणी,
सपना पाटणी आदीनी परिश्रम घेतले असल्याची माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा व पियुष कासलवीाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली. आभार प्रदर्शन जयश्री लोहाडे यांनी केले