Marmik
लाइफ स्टाइल

हिंगोली जिल्ह्यात 266 गावात एक गाव एक गणपतीची स्थापना

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने आणि विभागाच्या वातावरणात 19 सप्टेंबर रोजी श्रींची स्थापना करण्यात आली. यावर्षी जिल्ह्यातील 266 गावांमध्ये पर्यावरण पूरक ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवून एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली.

तसेच शहरी भागात 268 गणेश मंडळांना परवाना देण्यात आला तर 3 गणेश मंडळ विनापरवाना आहेत. ग्रामीण भागात 974 गणेश मंडळांना परवाना देण्यात आला तर 177 गणेश मंडळे विनापरवाना आहेत. जिल्ह्यात एकूण 1422 गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात 19 सप्टेंबर रोजी शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एकूण 1422 गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. यामध्ये शहरी भागात पुढील प्रमाणे गणेश मंडळांची स्थापना झाली आहे.

हिंगोली शहरात 102 औंढा नागनाथ, नागनाथ 22 कळमनुरी 25, गणेश मंडळांची स्थापना झाली असून 3 गणेश मंडळे विनापरवाना आहेत. वसमत शहरात 109 सेनगाव 10, असे एकूण 271 गणेश मंडळे स्थापन झाली आहेत.

तसेच ग्रामीण भागात पुढील प्रमाणे गणेश मंडळे स्थापन झाली आहेत. औंढा नागनाथ तालुक्यात 57, विनापरवाना 23, एकूण 80, कळमनुरी तालुक्यात 65, विनापरवाना 40, एकूण 105, सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत १४९, आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत 113 तर विनापरवाना 10, एकूण 123, हट्टा पोलीस ठाणे अंतर्गत 131, विनापरवाना 27, एकूण 158, कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत 79, विनापरवाना 47, एकूण 126,

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत 80, विनापरवाना 6, एकूण 86, गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत 105, नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीत 44, विनापरवाना 8, एकूण 52, बासंबा पोलीस ठाणे हद्दीत 51, विनापरवाना 16, एकूण 67, वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत 100, असे एकूण 974 परवाना तर 177 विनापरवाना असे एकूण 1151 गणेश मंडळांची ग्रामीण भागात स्थापना झाली आहे.

जिल्ह्यातील 266 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे.

Related posts

जिल्ह्यात बैल पोळा उत्साहात साजरा

Santosh Awchar

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुस्तक महोत्सव

Gajanan Jogdand

आडोळ येथे महादेव महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन; सोमवारी होणार शंकर पट

Gajanan Jogdand

Leave a Comment