मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची 13 जानेवारी रोजी कायाकल्प अंतर्गत रुग्णालयाचे गुणांकन व तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकास सर्वत्र स्वच्छता व सुव्यवस्था दिसून आल्याने या पथकाने समाधान व्यक्त केले.
यावेळी रुग्णालयाचे गुणांकन तपासणीसाठी डॉ. संघर्ष राठोड (ADHS), डॉ. संग्राम केंद्रे व डॉ.प्रशांत पुठावार यांच्या विशेष टीमने रुग्णालयास भेट देऊन प्रत्येक विभागाने उल्लेखनीय काम केल्याचे दिसून आले. सर्वप्रथम ओपीडी, वॉर्ड व बाहेरील परिसर अतिशय स्वच्छ दिसून आला. रुग्णालयातील रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याची व शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था व 24 तास प्रसूती सेवा उपलब्ध असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
रुग्णालयीन कायाकल्प गुणांकन तपासणी करीता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितीन तडस , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोरे, डॉ.मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण कुऱ्हाडे, गोपाळ कदम यांच्या कुशल मार्गदर्शना खाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन व्ही. राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय व्ही.बगाटे यांच्या नेतृत्वाखाली
ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिसेविका रूपाली खोलगडे, अधीपरिचारिका प्रतिमा बगाटे, माधुरी कदम, प्राजक्ता उघडे, सपना धोतरे, शितल चेने व इतर सर्व अधिपरिचारिका, लॅबतंत्रज्ञ विद्या तोर (चव्हाण), स्वाती पारसकर कक्ष सेवक संदीप मोरे, अनिल भगत, गजानन झगरे, बालाजी आडे , औषध निर्माण अधिकारी सपना बरडे,
समुपदेशक संदीप राठोड, डाटा ऑपरेटर शिवाजी अवचार, मेस्कोचे सर्व सुरक्षा रक्षक व इतर सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कायाकल्प अंतर्गत रूग्णालयास गुनांकन मिळण्यासाठी परिश्रम घेतले. यापुढेही सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे सुरु राहतील, असे कळविण्यात आले आहे.