Marmik
Hingoli live

प्रत्येक कुटुंबांनी लखपती होण्यासाठी मग्रारोहयोची मदत घ्यावी-अपर मुख्य सचिव नंदकुमार 

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – प्रत्येक कुटुंबाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून काम देता येणार असून आपल्या कौशल्यानुसार आवश्यक ती कामाची मागणी नोंदवावी आणि प्रत्येक कुटुंब लखपती होण्यासाठी मग्रारोहयोची मदत घ्यावी. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःची प्रगती करावी, असे आवाहन अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले आहे.

हिंगोली तालुक्यातील दिग्रस वाणी येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात येत आहे. या कार्यक्रमात गाव सभेमध्ये अपर मुख्य सचिव नंदकुमार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चित्राताई कुर्हे होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी कमलाकर फड,  शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार नवनाथ वगवाड, तालुका कृषी अधिकारी बालाजी गाडगे, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन मत्ता निर्मिती करावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास विविध यंत्रणांचे अधिकारी, मंडळ अधिकारी सय्यद अयुब, तलाठी वामन राठोड, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी भोजे यांनी केले आहे.

Related posts

हिंगोली व औंढा नागनाथ येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 11 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई

Santosh Awchar

Hingoli पन्नास गावच्या सरपंचांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर टाकला विश्वास

Santosh Awchar

काढलेल्या सोयाबीनचा झाला ‘चिखल’! खानापूर चित्ता येथील चित्र

Gajanan Jogdand

Leave a Comment