Marmik
Hingoli live News

हिंगोलीत पोलिसांच्या आशीर्वादाने सर्व काही अलबेल; पोलीस घेत आहेत हप्ते

हिंगोली : प्रतिनिधी

शहरातील पोलिसांच्या आशीर्वादाने सर्व काही आलबेल असल्याचे चित्र हिंगोलीत मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. विशेष म्हणजे अवैध धंद्यांना वाल्यांकडून पोलीस हप्ता घेत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

हिंगोली येथील शहर पोलीस ठाण्याचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. शहरात चोरीच्या अनेक घटना घडत असून आठ ते दहा दिवसापूर्वीच नगर परिषद कार्यालयाच्या नूतन इमारत येथून एका अधिकाऱ्याची मोटारसायकलची चोरी गेल्याची घटनाही घडली आहेत. तसेच शहरात गुटका माफिया व अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढले असून पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पोलीस व अवैध धंदेवाल्यात अर्थपूर्ण देवाण-घेवाण होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

शहरातील अनेक शाळांना पानटपरी यांचा विळखा

शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात पान टपरी यांनी विळखा घातला आहे. विशेष म्हणजे शहरातील गांधी चौकापासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर असलेल्या एका शाळेचा तर 50 मीटर अंतरावरच अनेक जानकर यांनी आपले दुकान मांडले आहे. शहरातील इतर अनेक शाळांच्या परिसरात ही पानटपऱ्या टाकण्यात आल्याचे चित्र असून शाळेत येणारे विद्यार्थी हे धूम्रपानाच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. या पानटपऱ्या चालकांवर पोलीस केव्हा कारवाई करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Related posts

सेनगाव पोलीस ठाणे अंतर्गत अवैध दारूचा महापूर! पहिल्या धारेची दारू मिळवण्यासाठी मद्यपींची गर्दी; पोलिसांचे अभय

Gajanan Jogdand

कोरड्या विहिरीत पडलेल्या इसमाचा भूकबळीने मृत्यू

Gajanan Jogdand

वाहन चोरणारी आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात! एक आयशर टेम्पो व अल्टो कार जप्त

Gajanan Jogdand

Leave a Comment