मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील जिल्हा पोलीस भरती – 21 मधील 21 रिक्त पदांच्या भरतीसाठी आवेदन पत्र सादर करण्यास 15 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत हिंगोली जिल्हा पोलीस दलात असलेल्या 21 पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून आवेदन पत्र मागविण्यात आले होते.
पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने आवेदन पत्र सादर करावयाचे होते. त्यास आता मुदतवाढ देण्यात आली असून 15 डिसेंबर 2022 पर्यंत उमेदवारांना आपले आवेदन पत्र भरता येणार आहेत.
या भरतीसाठी जिल्ह्यातील तरुण मेहनत घेत असून नियमित सराव करत आहेत.
भरती प्रक्रियेत उमेदवारांनी दलालांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन मार्मिक महाराष्ट्र समूहाच्या वतीने करण्यात येत आहे.