Marmik
Hingoli live Love हिंगोली News क्राईम

बनावट सोने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! बोगस कलेक्टर नंतर महावितरणचा बोगस अधीक्षक अभियंता स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात!!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात बनावट सोने विक्री करणाऱ्या टोळीचा हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे सदरील सोने विक्री करणारा व्यक्ती हा महावितरणचा अधीक्षक अभियंता असल्याचे भासवत होता. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यात बनावट सोने विक्री करणारी टोळी वावरत असून हिंगोली शहरातील सराफा बाजारात बनावट सोने विक्रीचा प्रयत्न झाला आहे.

तसेच गोल्ड लोन फायनान्स मध्येही बनावट सोने गहाण ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी माहिती मिळाल्यावरून हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर टोळीचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक नेमण्यात आले होते.

5 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाल्या वरून हिंगोली ते कळमनुरी जाणाऱ्या रोडवरील ऋषिकेश हॉटेल समोर बनावट सोने विक्री करणारा एक इसम सिल्वर रंगाची कार घेऊन उभा आहे, अशी माहिती मिळाली या संदर्भाने पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता या ठिकाणी कार क्रमांक एमएच ४६ एडी 5794 व संशयित इसम नामे योगेश सुभाष इंगोले (रा. लासिना ता. जि. हिंगोली) हा मिळून आला.

पोलीस पथकाने सदर इसमास विचारपूस केली असता आरोपी योगेश याने त्याचा साथीदार संतोष देशमुख यांनी मिळून बनावट सोन्याच्या बांगड्या हिंगोली येथील सराफा दुकान व गोल्ड लोन फायनान्स वर विक्री करून गहाण ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

तसेच आरोपी योगेश इंगोले याने आपण महावितरणचा इंजिनियर असल्याचे भासवून तसे वेगवेगळ्या बनावट ओळखपत्र बनवून स्वतःच्या ताब्यातील खाजगी कारवर महाराष्ट्र शासन महावितरण नावाचे स्टिकर लावून जनतेची दिशाभूल करत असल्याची कबुली दिली.

आरोपी योगेश इंगोले याच्याकडून महावितरण अभियंता असल्याचे अनेक बनावट ओळखपत्र, कार, मोबाईल, असा एकूण तीन लाख 25 हजार रुपयांचा हस्तगत करण्यात आला.

आरोपी योगेश इंगोले व संतोष देशमुख या दोघाविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बनावट सोने प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ही कार्यवाही हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार लिंबाजी वावळे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, हरिभाऊ गुंजकर यांनी केली.

Related posts

हिंगोलीच्या गाडीपुरा भागातील सतत गुन्हे करणारा तरुण एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध

Santosh Awchar

लग्नाचे आमिष देऊन 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; पानकनेरगाव येथील घटना

Gajanan Jogdand

शेतकऱ्यांना मिळणार निशुल्क सोयाबीन बियाणे मिनीकिट

Santosh Awchar

Leave a Comment