हिंगोली : संतोष अवचार
जिल्हा पोलिस दलात प्रदीर्घकाळ, खडतर व निष्ठेने सेवा करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेले अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली 30 जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय संत नामदेव बैठक हॉल येथे पार पडला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व इतर पोलिस अधिकारी अंमलदार कार्यालयीन कर्मचारी व सेवानिवृत्त होत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते 30 जून रोजी नियत वयोमानानुसार पोलीस निरीक्षक मोहन तुळशीराम सरकाटे बिनतारी संदेश विभाग, पोलीस उपनिरीक्षक मनोज इंग्रजीवन जयस्वाल ने. पोलीस ठाणे हिंगोली शहर, पोलीस उपनिरीक्षक गणेश सिताराम कराळे ने. पोलीस स्टेशन कळमनुरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ज्ञानोबा विरकर ने. पोलीस स्टेशन औंढा नागनाथ, पोलीस उपनिरीक्षक रमेश लक्ष्मणराव सुरदुसे ने. वसमत शहर पोलीस ठाणे, चालक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद गणपतराव वागतकर ने. पोलीस ठाणे वसमत शहर पोलीस उपनिरीक्षक भगवान फकीरा सोळंके ने. पोलीस ठाणे बासंबा, स. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दत्तराव अवचार ने. पो. मु. हिंगोली, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब सोपानराव बोके स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल रामजी भडांगे ने. ग्रामीण पोलीस ठाणे हिंगोली, सहायक पोलिस निरीक्षक शेख रहीम शेख ने. पो. मु. हिंगोली पोलीस, हवलदार बक्कल नंबर 26 यादव गोपाळराव वाघमारे ने पोलीस ठाणे वसमत ग्रामीण, पोलीस हवालदार बक्कल नंबर 493 प्रकाश किसनराव गिरे ने जिल्हा विशेष शाखा हिंगोली हे सेवानिवृत्त झाले. यांचा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी केले तर पोलीस अधीक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी व अंमलदार यांच्या पुढील आयुष्य सुख, समृद्धीचे व आरोग्यसंपन्न जावो अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सेवानिवृत्त होत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस दलातील प्रदीर्घ अशा सेवा काळातील अनेक प्रसंगात आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी हिंगोली शहर पोलीस निरीक्षक यांनी उपस्थितांचे आभार मानले.