मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेले संभाजी पल्लेवाड व आर.डी. जाधव यांची नांदेड येथे बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हिंगोली येथील महावितरण कार्यालयात मागील काही वर्षांपासून संभाजी पल्लेवाड व आर. डी. जाधव हे कर्मचारी कार्यरत होते.
संभाजी पल्लेवाड यांच्याकडे हिंगोली शहरातील आजम कॉलनी व एनटीसी भाग सोपविण्यात आला होता. त्यांनी या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ दिली नाही. किती वाजता वीज पुरवठा खंडित झाला तरी तो त्यांनी सुरळीत केला.
तसेच या भागातील नागरिकांना समजून घेत त्यांच्या विजेच्या संदर्भातील अडचणी सोडवल्या त्यांच्या मनमिळाऊ आणि मदत करण्याच्या स्वभावाने ते या भागातील नागरिकांना आपलेसे वाटू लागले होते. त्यांची हिंगोली येथून नांदेड येथे नुकतीच बदली झाली आहे. संभाजी पल्लेवाड व आ.डी. जाधव यांना हिंगोली अर्बन 02 येथील कर्मचाऱ्यांनी निरोप दिला.
याप्रसंगी त्यांचा शाखा अभियंता चंदनखेडे व बेलसरे यांच्या हस्ते व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महावितरण कार्यालयातील कर्मचारी विश्वनाथ बनसोडे, शिंदे, गडदे, गजानन जाधव, कपिल मस्के, प्रदीप भुक्तर, अंकुश मस्के विठ्ठल ढाकरे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल ढाकरे यांनी केले.