Marmik
News

डोंबिवलीत पुन्हा आग; एमआयडीसीतील कंपन्यांची सुरक्षा वाऱ्यावर!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष आठवले :-

ठाणे – जिल्ह्यातील डोंबिवली येथील एमआयडीसी फेस – 2 मधील केमिकल कंपनी इंडो-अमीन मध्ये 11 जून रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली आगीत अद्याप जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त असले तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. मे महिन्यात डोंबिवलीत आगीची घटना घडल्यानंतर अवघ्या काही दिवसात आगीची ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे एमआयडीसी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

मे महिन्यात डोंबिवली येथील केमिकल कंपनीत अशीच आग लागली होती. आगीच मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले होते. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात उठले होते.

तसेच फोटांनी दोन ते तीन किलोमीटर चा परिसर हा दणाणून गेला होता. त्यानंतर जून महिन्यात डोंबिवली एमआयडीसीतील फेस – 2 मधील केमिकल कंपनी असलेल्या इंडो-अमीन मध्ये 11 जून रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

आगीची घटना समजतात KDMC विभागातील अग्निशमन दल व मुख्य सहकारी घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. या मध्ये सुदैवाने कोणतीही जीविहानी नाही झाली. आगीचे कारण समजू शकले नाही.

डोंबिवली एमआयडीसी वारंवार आग लागत असून येथील नागरिक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. तसेच केमिकल कंपन्यांनाच आग लागत असल्याने दुर्गंधीचा त्रासही एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांसह एमआयडीसी जवळील रहिवासी असलेल्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे एमआयडीसी प्रशासनाने तसेच राज्य शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Related posts

Hingoli पारोळा धबधबा ओसंडून वाहू लागला; पर्यटकांची गर्दी

Santosh Awchar

आता सर्वच शाळकरी मुलांना मिळणार मोफत गणवेश, बूट जोडे आणि पायमोजे

Santosh Awchar

कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी!             

Santosh Awchar

Leave a Comment