Marmik
Love हिंगोली

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार 

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी  अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली होती.

या अभियानात सर्वात स्वच्छ कार्यालयाचा प्रथम पुरस्कार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,हिंगोली यांना मिळाला आहे.           

त्यानिमित्त हिंगोली नगर परिषदेमार्फत आयोजित समारंभात सर्वात स्वच्छ कार्यालय प्रथम पारितोषक पुरस्कार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.             

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.         

Related posts

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हिंगोलीतील नागरिकांना आंघोळ नाही! नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार

Gajanan Jogdand

संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या गणेश विसर्जन निर्माल्य कुंडीस मान्यवरांच्या भेटी

Santosh Awchar

न.प.संघटनेचे राज्याध्यक्ष डी.पी. शिंदे यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार

Santosh Awchar

Leave a Comment