मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील लोकसभा निवडणूक रिंगणात प्रमुख महायुती व महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढतीचा मुख्य सामना पहावयास मिळाला आहे. या पक्षांच्या तिन्ही उमेदवारांमुळे सदरील निवडणूक पंचरंगी होणार आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभेत लोकशाहीचा लोकोत्सवाचा (मतदानाचा) उत्साह शिगेला पोहोचला आहे.
लोकसभेच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता 16 मार्च रोजी लागू झाली. सुरुवातीला जागा वाटपात अडकलेल्या महायुतीच्या घटक पक्षात तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षातही थोडी – अधिक प्रमाणात का होईना रस्सीखेच पाहायला मिळाली. दोन्हीतील पक्षांकडून अनेकांची नावे पुढे येऊ लागली. मात्र निवडणूक रिंगणात उमेदवार उभा करण्यास महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीही चांगलाच वेळ घेतला.
महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट यांच्या पक्षास जागा मिळाल्यानंतर पक्षाकडून आष्टीकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) गटास जागा सुटल्यानंतर या पक्षाकडून सुरुवातीला हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले.
मात्र महायुतीतील स्थानिकांच्या विरोधास त्यांच्या नावास प्रचंड विरोध झाला. त्यामुळे उमेदवार बदलून कोहळीकर यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. मात्र, महायुतीतील भाजपच्या पाटील सुमठाणकर आणि एड. जाधव यांनी बंडखोरी केली.
मात्र सुमठाणकर यांनी काही दिवसात आपला अर्ज मागे घेतला तर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक रिंगणातून माघार घेत महायुतीच्या उमेदवारास पाठिंबा दिला. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी कडून चव्हाण यांचे नाव जाहीर झाले. हिंगोली लोकसभेवर प्रामुख्याने शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे.
मात्र पक्ष फुटीमुळे दोन गट निर्माण होऊन एक सत्तेत तर दुसरा विरोधात उभा ठाकला आहे. त्यामुळे दोन्ही गटाने आप- आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आपले वर्चस्व पणाला लावले आहे. त्यास महायुतीतील भाजपसह घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील काँग्रेससह घटक पक्ष साथ देत आहेत.
दोन्ही कडील उमेदवार मराठा असल्याने व मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगता राहिला असल्याने त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा कितपत मिळतो हे पाहणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने आपली चांगलीच हवा केली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी चांगलीच धास्ती घेऊन निवडून येण्यासाठी आपले प्राणपणाला लावले आहेत.
विशेष म्हणजे निवडणूक रिंगणात उतरलेले हे तिन्ही प्रमुख उमेदवार शिवसेनेचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना मतदार कितपत पसंती देतात हे निवडणुकीनंतरच समजू शकणार आहे. वरील प्रमुख तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ त्या – त्या पक्षांच्या नेत्यांच्या सभा पार पडल्या. त्यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी कार्यकर्ते चांगलीच मेहनत घेताना दिसत आहेत.
हिंगोली लोकसभेतील गावोगावी जाऊन हे उमेदवार आपणास मतदान करण्यासाठी मतदारांना गळ घालताना दिसत आहेत. एकंदरीत निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
मात्र मतदार कोणास पसंती देतात हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेते अलिप्त राहिले. त्यामुळे दोन्ही कडील उमेदवारास त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या आणि सोबत असलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा विरोध तर नाही? हे समजायला मार्ग नाही.
परिणामी काही एक गृहीतक धरून या उमेदवारांना आप्त पक्षांसह विरोधातील उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकमेकास टक्कर देत आहेतच सोबतच ‘वंचित’चे मोठे आव्हानही त्यांच्या पुढे असल्याने त्याचा सामनाही त्यांना करावा लागत आहे.
एकंदरीत ही निवडणूक प्रमुख या तिन्ही पक्ष्यांच्या उमेदवारांमध्ये पंचरंगी होणार असल्याचे दिसते. आज सायंकाळी सर्व पक्षांचा प्रचार थांबणार आहे.
प्रचार थांबण्या च्या वेळेपूर्वी शिवसेना (एकनाथ शिंदे) गट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट यांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आज रोजी संपन्न होत आहेत. एकंदरीत दोन्ही गटाकडून ही निवडणूक प्राण पणाला लावली जात आहे..