Marmik
Hingoli live

यंदा हिंगोली जिल्ह्यासाठी पाच स्थानिक सुट्या जाहीर         

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वय हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी चालू 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी पाच स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

राज्य शासनाच्या दि. 6 जानेवारी, 1958 व 29 जून, 1982 रोजीच्या  शासन  निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सन-2023 या वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.            

मंगळवार, दि. 21 फेब्रुवारी, 2023 रोजी  रथ उत्सव औंढा नागनाथ, शुक्रवार दि. 22 सप्टेंबर,2023 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन (महालक्ष्मी) आणि सोमवार, दि. 13 नोव्हेंबर,2023 रोजी दर्श अमावस्या (दिपावली) सणानिमित्त स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व  खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

Related posts

सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम: पानकनेरगाव येथे विविध कार्यक्रम

Gajanan Jogdand

औंढा नागनाथ शहरात शिवसेनेचा जल्लोष; गाव तेथे बूथ होणार

Gajanan Jogdand

‘जिथे कमी तिथे आम्ही’ उपक्रमांतर्गत 18 जूनला गुणगौरव सोहळा

Santosh Awchar

Leave a Comment