मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील कोळसा येथील विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आले.
विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळा संस्थेचे सचिव अंकुशराव रामराव बेंगाळ यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव रामराव बेंगाळ ,उपाध्यक्षा आनंदीताई भास्करराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भास्करराव बेंगाळ, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सानप एस.एस., प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सरकटे व्ही.एस., आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बाजगिरे बी.जी., पर्यवेक्षक कसाब पी.पी. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शाळेमध्ये निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.