Marmik
Hingoli live

वसमत येथील पूर परिस्थिती आटोक्यात; पाणी ओसरले, प्रशासनाचा रात्रीपासून ठिय्या!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – वसमत येथे 27 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरा लगत वाहणाऱ्या उघड्या नदीस मोठा पूर आला. तसेच गुरुद्वारा तलाव फुटल्याने नागरिकांच्या घरात व रस्त्यांवर जवळपास तीन ते चार फूट पाणी वाहू लागले होते. पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व बचाव कार्यासाठी वसमत येथील उपविभागीय अधिकारी व प्रशासन हे रात्री 11 वाजेपासून वसमत येथे ठिय्या देऊन होते. पाणी ओसरू लागल्याने आता येथील पूर परिस्थिती आटोक्यात आली आहे.

27 जुलै रोजी वसमत येथे सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने वसमत शहरालगत वाहणाऱ्या उघडी नदीस मोठा पूर आला. पुराचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचले.

नदीला आलेल्या पुरामुळे वसमत – मालेगाव- कासरखेडा – नांदेड मार्ग तसेच वसमत – असेगाव – नांदेड मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला होता. तसेच मुसळधार पावसाने वसमत शहरातील असलेल्या गुरुद्वारा तलाव ओवरफ्लो होऊन तोही फुटला.

या तलावाचे पाणी शहरात बांधण्यात आलेल्या दहा वर्षांपूर्वीच्या व सध्या बंद असलेल्या कॅनॉलमध्ये शिरले हे कॅनॉलही ओव्हरफ्लो होऊन शेवटी पाणी नागरिकांच्या घरात शिरले. पावसाचा जोर कायम राहिल्याने नागरिकांच्या घरात व रस्त्यांवर जवळपास तीन ते चार फूट पाणी वाहू लागले होते.

या पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अन्नधान्यही वाहून गेले आहे. तसेच संसार उपयोगी साहित्य कपडे हेही वाहून गेले असून व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

येथील पूर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून रात्री अकरा वाजेपासून स्वतः उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व आपत्ती व्यवस्थापन टीम येथे ठिय्या देऊन होते. या टीमने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते.

28 जुलै रोजी सकाळपर्यंत पुराचे पाणी वसरल्याने आता येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Related posts

गुरुपौर्णिमा : सिद्धनाथ महादेव मठ येथे भाविकांची मांदियाळी

Gajanan Jogdand

वर्कशॉप, शेतातील मोटार व इतर साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

Hingoli राज्याला केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच मिळाले, हे सरकार लोकांपर्यंत पोहोचले नाही – जयंत पाटील

Santosh Awchar

Leave a Comment