Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

जितो लेडीज विंग तर्फे उडाण प्रदर्शनाचे आयोजन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – जितो लेडिज विंग तर्फे नेहमी सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. याच अंतर्गत महिलांनी बनविलेल्या वस्तुंना चालना मिळावी या हेतुने दि. २ व ३ ऑगस्ट रोजी पाटीदार भवन जालना रोड येथे लेडीज विंग उडाण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्राचे वाईस चेअरमेन रवि खिवंसरा, जितो चाप्टर संभाजीनगर चे चेअरमेन पारस ओस्तवाल, सचिव दिनेश मुथा, जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा डिंपल पगारिया, चिफ सचिव प्रिया मुथा व सर्व सदस्य यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दि. २ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्य करणा-या महिलांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन संगीता ललवाणी, वैशाली छाजेड, पुष्पाताईजी संदिपानजी भुमरे, अंजली अतुल सावे, वैशाली संजय केणेकर, देवयानी डोणगावकर, प्रियंका परमार, भारती बागरेचा, अंजली भागवत कराड, मनिषा भंसाली, राखी देसरडा, देवयानीजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन जितो महाराष्ट्राचे रविजी खिवंसरा,पारस ओस्तवाल, दिनेश मुथा, पुखराज पगारिया, सुभाषजी नहार, गौतमचंद संचेती, झुंबरलाल पगारिया, मिठालालजी कांकरिया, अनिलमामा संचेती आदींचया प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या प्रदर्शनी मध्ये सर्व स्तरातील महिलांचा सहभाग राहणार आहे. या ट्रेड फेअरमध्ये गृहउपयोगी वस्तु तसेच राखी सनानिमीत महिलांनी घरी बनविलेल्या आकर्षक राखीचे सुध्दा प्रदर्शन येथे होणार आहे.

त्याच प्रमाणे कपडे,ज्वेलरी,विविध प्रकारच्या राख्या,भेट वस्तु,बेलशीट,वास्तुकला तसेच वेगवेळया प्रकारच्या खादय पदार्थाचे स्टॉलसाडी डॆस,ज्वेलरी, आदीचे स्टॉल राहणार आहे. तसेच हाताने बनविलेले राखी, भिस्कीट, केक आदी पदार्थांचे स्टॉल येथे लावण्यात येणार आहे. हे या प्रदर्शनी मध्ये सकाळी १० ते रात्री ८ पर्यत उघडे राहणार आहे.

या प्रदर्शनीमध्ये अनाथआश्रम व मतीमंद अंध विदयालयातील मुलांनाही तयार केलेल्या विविध वस्तुंचे स्टॉलही लावण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी जयपूर जोधपुर पुना मुंबई,गुजरात,नाशिक,जळगांव ,धुळे,परभणी आदी ठिकाणाहुन सुध्दा ११० स्टॉल लावण्यात येणार आहे.

सर्व स्तरातील लोकाना मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे. सदर कार्यकम जितो लेडीज विंग या सतत वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यकम व जनकल्याणकारी योजना वेगवेगळया ठिकाणी करत असतात त्या अनुषंगाने महिलांनी घरी बनविलेले पदार्थाचा प्रचार व्हावा व महिलांना चालना मिळावी या हेतुने या ट्रेड फेअरचे आयोजन केले आहे.

या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘जितो लेडीज विंग’ चे महाराष्ट्राचे वाईस चेअरमेन रवि खिवंसरा, जितो चाप्टर संभाजीनगर चे चेअरमेन पारस ओस्तवाल, सचिव दिनेश मुथा, जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा डिंपल पगारिया, चिफ सचिव प्रिया मुथा व सदस्य यांनी दिली.

Related posts

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची २२ जानेवारी रोजी बैठक

Gajanan Jogdand

वाराई कामास प्रतिबंध : छत्रपती संभाजीनगरात पणन संचालकाचा निषेध

Gajanan Jogdand

11 डिसेंबर रोजी विभागीय लोकशाही दिन

Gajanan Jogdand

Leave a Comment