मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे घडलेल्या जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 7 दिवसात उघडकीस आला आहे. यावेळी पोलिसांनी सोन्या – चांदीचे दागिने असा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच चोरी करणाऱ्या दोघा भावांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे 23 जानेवारी 2024 रोजी रात्री च्या दरम्यान फिर्यादी सुदाम वैद्य यांच्या घरी अनोळखी आरोपींनी घरातील चैनल गेटचे लॉक तोडून घरात प्रवेश केला.
तसेच त्यांच्याकडील हत्यारांनी फिर्यादीला जबर मारहाण करून जखमी केले तसेच बेडरूम मधील कपाटातील नगदी व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा तात्काळ उघड करून त्यातील आरोपींना अटक करण्याबाबत हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांचे पथक तसेच आखाडाबाळापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केले.
गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपास करत अवघ्या सात दिवसातच सदरचा गुन्हा उघडकीस आणला तपास पथकाला तपासात सदरील गुन्हा हा निवघा बाजार जिल्हा नांदेड येथील चापरान पान बाबू भोसले याने त्याच्या इतर साथीदारामार्फत मिळून केल्याची माहिती मिळाली.
यावरून तपास पथकाने 30 जानेवारी रोजी सापळा रुचून सदरील आरोपी चापरान पानबाबू भोसले व त्याचा भाऊ दशरथ तानबाबू भोसले (दोन्ही राहणार निवघा बाजार जिल्हा नांदेड) यांना सीताफिने ताब्यात घेतले.
सदरील आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी सदर गुन्हा त्यांच्या इतर दोन साथीदार राम दिगंबर काळे व प्रकाश श्रवण काळे यांच्यासह मिळून केल्याची कबुली दिली.
पोलीस पथकाने नमूद आरोपींच्या ताब्यातून 7 ग्रॅम सोन्याचे मनी (किंमत 21 हजार रुपये), 2 ग्रॅम सोन्याचे गळ्यातील ओम व पेटी (किंमत अंदाजे चार हजार रुपये) व 20 डोळे लहान मुलाचे चांदीचे कडे, वाळे, बाजूबंद, दंडकडे (किंमत अंदाजे सहा हजार रुपये) असा एकूण 31 हजार रुपये सोन्या – चांदीचे दागिने जप्त केले.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल पिल्लू, पोलीस उपनिरीक्षक माजीद शेख, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, नागोराव वाबळे, ग्यादलवाड, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, शिवाजी पवार, तुषार ठाकरे, दीपक पाटील यांनी केली.