मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – येथील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणार्थ सेवापथ सोशल फाउंडेशन च्या वतीने मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
छत्रपती संभाजी नगर लगत असलेल्या शेंद्रा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत सेवापथ सोशल फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणार्थ मोफत मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
या शिबिरास प्रशिक्षिका प्रतिभा पांडे, प्रशिक्षक गितेश गंगावणे, संस्थापक अध्यक्ष अकबर अ. शेख यांची उपस्थिती होती. तसेच मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाघ व शिक्षक संजीव देवरे हे उपस्थित होते.
या शिबिरास छत्रपती संभाजी नगर ग्रामीण दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संकटकालीन मदतीसाठी डायल 112 व हेल्पलाइन क्रमांक विषयी माहिती दिली.
तसेच ‘गुड टच, बॅड टच’ याबाबतही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या शिबिरास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
शिबिरासाठी जिल्हा परिषद शालेय शिक्षण समिती केंद्राचे अध्यक्ष राम कचकुरे, उपाध्यक्ष निसारखान पठाण तसेच शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती सदस्य यांनी सहकार्य केले.