मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षा (डा प कू) चे नूतन जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. ज्ञानेश्वर चौधरी यांची मार्मिक महाराष्ट्र समूहाचे संपादक श्री. गजानन जोगदंड यांनी 12 सप्टेंबर सोमवार रोजी सदिच्छा भेट घेतली व जिल्हा कार्यक्रमाधिकारी चौधरी यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी उद्धव कदम यांची उस्मानाबाद येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात बदली झाल्याने हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा पर्यवेक्षक श्री. ज्ञानेश्वर चौधरी यांची जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण जिल्हा कार्यक्रम अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
ज्ञानेश्वर चौधरी यांनी सदरील पदाचा अतिरिक्त पदभार घेतल्यानंतर रुग्ण कल्याण व रुग्णसेवेस स्वतःला समर्पित करून घेतले आहे.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. ज्ञानेश्वर चौधरी यांनी नागरिकांच्या आणि रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व कामे केली जातील असे सांगून सदरील कक्ष कशा पद्धतीने काम करतो, रुग्णसेवा, आरोग्य, योजना याबाबत मार्मिक महाराष्ट्राचे संपादक श्री. गजानन जोगदंड यांना माहिती दिली. यावेळी कक्षातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.