मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्हाभरात आपल्या लाडक्या बाप्पास 28 सप्टेंबर रोजी नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने निरोप दिला. यानिमित्त हिंगोली नगरपरिषद आणि महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पुढे श्री गणेश विसर्जन कुंड निर्माण करण्यात आले होते. या कुंडीस अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.मागील दहा ते अकरा दिवसांपासून घराघरात आगमन झालेल्या लाडक्या गणरायास 28 सप्टेंबर रोजी नागरिकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.
नागरिकांनी गणेश विसर्जनानिमित्त गणेश मूर्ती नदी तलाव आदी ठिकाणी विसर्जित न करता ती विसर्जन कुंडीत व्हावी म्हणून हिंगोली नगर परिषदेच्या वतीने अनेक ठिकाणी विसर्जन कुंड निर्माण करण्यात आले होते.
यामध्ये हिंगोली नगर परिषदेच्या जुन्या इमारती समोर असलेल्या अग्निशमन दल विभागाच्या पुढे हिंगोली नगरपरिषद आणि संकल्प बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगणेश मूर्तीच्या निर्माल्यासाठी विसर्जन कुंड निर्माण करण्यात आली आहे.
सदरील कुंडीत 28 सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी साडेसात वाजेपासून नागरिकांनी आपापल्या घरातील श्रींची मुर्त्या आणून या कुंडीत विसर्जित करण्यात येऊ लागल्या. रात्री उशिरापर्यंत नागरिक आपल्या लाडक्या बाप्पास येथे आणून विसर्जित करत होते.
दरम्यान, या विसर्जन कुंडीस हिंगोली येथील नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी तथा हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे प्रबळ उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे. शासकीय गुत्तेदार मयूर कयाल, नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंदू लव्हाळे, नगर परिषदेचे अभियंता रत्नाकर अडसिरे, नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, श्याम माळवटकर, संदीप घुगे पत्रकार आदींनी भेटी दिल्या.
तसेच शहरातील काही इतर मान्यवरांनीही विसर्जन कुंडीस भेट देऊन श्रींचे विसर्जन केले. या कुंडीतील श्रीगणेश मूर्तीच्या निर्माल्याची जबाबदारी संकल्प बहुउद्देशीय सेवा संस्थेने घेतलेली आहे.
यावेळी संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य गजानन गायकवाड यांच्यासह पत्रकार प्रद्युम्न गिरीकर, सुधीर गोगटे नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.