मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील एमआयडीसी परिसरातील 220 केवी उपकेंद्र लिंबाळा मक्ता येथील कार्यालयाच्या प्रांगणातून विद्युत विभागाचे विविध उपकरणे व धातूचे साहित्य चोरी गेल्या बाबत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
तसेच 29 नोव्हेंबर 2022 रोजी 132 केवी विद्युत उपकेंद्र हिंगोली येथून विद्युत विभागाचे विविध उपकरणे व धातूचे साहित्य चोरी गेल्या बाबत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून गुन्हे उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकास सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, हिंगोली शहर व ग्रामीण हद्दीतील विद्युत कार्यालयातील विविध उपकरणांची चोरी ही लिंबाळा मक्ता येथील करण जिलान्या पवार, विजय किसन काळे, संजय उर्फ काल्या पंडित काळे, मुस्तकीन शेख शबाना यांनी मिळून केली आहे.
तसेच ते सध्या लिंबाळा मक्ता एमआयडीसी परिसरात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने आरोपी करण जिलाण्या पवार, विजय किसन काळे यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी संजय उर्फ काल्या पंडित काळे व मुस्तकीन शेख शबाना यांच्यासोबत मिळून उपरोक्त नमूद प्रमाणे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरीतील हिशाला आलेला नगदी 30 हजार रुपये मुद्देमाल काढून दिला.
सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीचे अनेक चोरी व घरपोडीचे गुन्हे दाखल असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कार्यवाही जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, संभाजी लकुळे, लिंबाजी वाहुळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, जावेद शेख, प्रशांत वाघमारे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली तसेच सायबर सेलचे इरफान पठाण व रोहित मुदीराज यांनी केली.