Marmik
Hingoli live क्राईम

वसमत येथे सापडला शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा, पोलिसांची धडक कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील वसमत येथे भिकारी चौक ते कारंजा जाणाऱ्या रोडवरील एका टीन पत्राच्या टपरीत साठवून ठेवलेला शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजा जप्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी धडक कार्यवाही करत 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात लपून छपून चालणारे अवैध धंद्यांबाबत कठोर भूमिका घेत त्यावर कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथक तसेच सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही बाबत विशेष मोहीमही राबविली जात आहे.

5 फेब्रुवारी रोजी वसमत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वसमत शहरातील भिकारी चौक ते कारंजा जाणाऱ्या रोडवरील सागर आर्ट नावाच्या टीन पत्राच्या टपरीत सागर सटवाजी कदम हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदेशीररित्या अपव्यापार करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा बाळगून आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून वसमत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार असे शासकीय पंच वजन काटा मापक फोटोग्राफर आवश्यक साहित्यासह रात्री 8 वाजून पाच मिनिटांनी नमूद टपरीवर छापा मारला.

यावेळी सदर टपरीतून आरोपी नामे सागर सटवाजी कदम (वय 43 वर्ष रा.आदर्श नगर वसमत) याच्या ताब्यातून शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाच्या झाडांचा वाळलेला पालापाचोळा जे एकूण पाच पाकीटात चिकटपट्टी लावून घट्ट बांधून ठेवलेले होते. त्याचे आणलेल्या वजन काट्यावर वजन केले असता एकूण 10 किलो 509 ग्रॅम भरले त्याची किंमत 1 लाख 5 हजार रुपये चा मुद्देमाल मिळून आला.

पोलिसांनी पंचनामा करून सदरील मुद्देमाल जप्त केला असून वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल महीपाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कलम 20 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे अधिनियम 1985 अन्वये वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे करत आहेत.

ही कार्यवाही हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरीक्षक राहुल महीपाळे, पोलिस अंमलदार शेख हकीम, चव्हाण, हेंद्रे, पोले, पुरी सर्व वसमत पोलीस ठाणे शहर यांनी केली.

Related posts

मोटारपंप चोरणाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुस्क्या

Gajanan Jogdand

पूरस्थिती : कुरुंदा व परिसरात जिल्हा प्रशासनाकडून मदत कार्य सुरू

Santosh Awchar

हिंगोलीच्या तापमानाने चाळिशी ओलांडली! नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Santosh Awchar

Leave a Comment