मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरातील जवळा पळशी रोडवरील मल्हारवाडी येथे एका इसमा कडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मुक्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हिंगोली शहरात मल्हारवाडी जवळा पळशी रोड येथील इसम नामे किरण रत्नाकर जाधव यांच्याजवळ बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल असून तो सध्या त्याच्या राहते घरी आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने सदर मिळालेल्या माहिती ठिकाणी गोपनीय पद्धतीने सापळा रचून किरण रत्नाकर जाधव रा. मल्हारवाडी जवळा पळशी रोड हिंगोली यास सीताफिने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून बेकायदेशीर रित्या एक गावठी बनावटीचे पिस्टल (ज्याची एकूण किंमत 20 हजार रुपये) मिळून आले.
सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, दत्ता नागरे यांनी केली.