मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव – जिंतूर रोडवर असलेल्या आर के हॉटेल समोर एका व्यक्तीकडून बेकायदेशीररित्या गावठी पिस्तल अग्निशस्त्र मिळून आले. सदरील व्यक्तीस हत्यारासह पकडून आरोपी विरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुरनं. 337 / 2023 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
30 सप्टेंबर रोजी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती वरून सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील सेनगाव – जिंतूर जाणाऱ्या मार्गावरील आर. के. हॉटेल समोर एक इसम स्वतःकडे बेकायदेशीर गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र) बाळगून आहे.
मिळालेल्या माहितीवरून हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांच्या पथकाने नमूद परिसरात जाऊन मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कार्यवाहीचे नियोजन करत सदर परिसरातून एक इसम विशाल ईश्वर चव्हाण (वय 19 वर्षे रा. सातोना ता. परतुर जि. जालना) यास ताब्यात घेतले.
त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात कमरेला शर्ट खाली एक लोखंडी गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) जुनी वापरती (किंमत 15 हजार रुपये) मिळून आले.
नमूद इसमास गावठी पिस्टलसह ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुरनं 337 / 2023 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन माधव शिंदे, हरिभाऊ गुंजकर, तुषार ठाकरे, दीपक पाटील यांनी केली.