Marmik
सिनेमा

सत्तेचा थरार अनुभवण्यास व्हा सज्ज! सत्ता कोणाचीही असो ‘खुर्ची’ आपलीच!! 12 जानेवारीपासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होतोय ‘खुर्ची’ चित्रपट

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – सत्ता कुणाचीही असो खुर्ची आपलीच अशा तोऱ्यात मिरवणाऱ्या आणि सत्तेसाठी ची लढाई दाखवणारा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘खुर्ची’ हा 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ‘टिझर’ने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली असून खुर्चीच राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना अवघ्या काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे..

सत्तेसाठीची लढाई रंगणार… संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि योग आशा फिल्म्स’ निर्मिती संस्थेतर्फे संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी, प्रदीप नथ्थिसिंग नागर निर्मित आणि शिव धर्मराज माने व संतोष हगवणे दिग्दर्शित ‘खुर्ची’ सिनेमा 12 जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच नववर्षाचे स्वागत करायला रोमँटिक, ॲक्शनचा भरणा असलेला एक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे.

सत्ता कुणाची पण असो आता खुर्ची आपलीच असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 12 जानेवारी 2024 ला हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचा टिझर आल्यापासून खुर्चीच राजकारण पाहण्याची प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. आता या उत्सुकतेला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे.

संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नथ्थिसिंग नागर यांनी चोखपणे सांभाळली आहे. डॉ. अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहेत.

या चित्रपटाची कथा पटकथा संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. राहुल रामपाल या चित्रपटाचे सह दिग्दर्शन करत आहेत. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रतीक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे.

चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची गाणी प्रशांत मडपूवार, सनकी स्वरर्भ व संजय शिंदे लिखित असून सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी गाण्यांना संगीत दिले आहे.

या चित्रपटातील गाणी आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखारकर, अमिता घोगरी आणि आर्यन यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केली आहेत. तर संगीताची धुरा अभिषेक काटे आणि सन्मित वाघमारे यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. म्युझिक अरेंजर म्हणून अमोघ इनामदार यांनी उत्तम काम केले आहे.

‘खुर्ची’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.

‘खुर्ची’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट नववर्षातील येत्या 12 जानेवारी पासून येणार असून खुर्चीच राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवसाची वाट बघावी लागणार आहे.

Related posts

रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ”नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित, ११ ऑक्टोबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Gajanan Jogdand

शिवरायांचा छावा १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

Gajanan Jogdand

‘सुपरस्टार सिंगर’ रंगणार सोनी मराठीवर, अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा’

Gajanan Jogdand

Leave a Comment