Marmik
Hingoli live क्राईम

गोंडाळ्याच्या शाहरुखचे दादा बनण्याचे स्वप्न भंगले! तलवार काढून धमकावत होता, पोलिसांनी घेतले ताब्यात

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील बोंडाळा येथील शाहरुख उर्फ अर्जुन पि. गणपत गायकवाड हा दादा बनण्यासाठी तलवार काढून धमकावत होता अखेर त्यास हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून ताब्यात घेतले आहे त्यामुळे त्याचे दादा बनण्याचे स्वप्न भंगले आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये शस्त्राचा वापर करून गंभीर गुन्हा न घडण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवैध शस्त्र वापरणाऱ्या विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन औंढा नागनाथ हद्दीत मौजे गोंडाळा या गावातील शाहरुख उर्फ अर्जुन पि. गणपत गायकवाड (वय 40 वर्ष) याने गावातील दादा बनण्यासाठी तलवार काढून धमकावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने शाहरुख उर्फ अर्जुन गणपत गायकवाड यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडील धारदार तलवार जप्त करून पोलीस स्टेशन औंढा येथे गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवले आहे आणि गोंढाळ्याच्या शाहरुखचे गोंडाळ्याचा दादा बनण्याचे स्वप्न बंगले आहे.

पोलिसांतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की कोणीही अवैधशास्त्र वापरू नये तसेच शस्त्रासह फोटो सोशल मीडियावर टाकू नये, हिंगोली पोलिसांची सदर घटनावर अतिशय बारकाईने नजर आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे,पोलीस अंमलदार गजानन पोकळे, किशोर कातकडे, लिंबाजी वाव्हळे, ज्ञानेश्वर पायघन यांच्या पथकाने केली आहे.

Related posts

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये 6 कोटी 68 लाख 67 हजार 550 रुपयांची 372 प्रकरणे निकाली 

Santosh Awchar

बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणार्‍यांवर धरपकड मोहीम सुरूच; गाडीपुरा येथील एकास उचलले

Santosh Awchar

‘ओडिफ प्लस’ला गती देण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे तात्काळ करा; व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सीईओ यांच्या सूचना

Gajanan Jogdand

Leave a Comment