मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शासन निर्णय दिं.15.5. 2014 च्या नियमाप्रमाणे प्रकरण 1 मधील 08 (07) नुसार जिल्हा परिषद कार्यालय/पंचायत समिती कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त 3 वर्षे व एका विभागात जास्तीत जास्त 5 वर्षे काम करता येईल. एकाच टेबलावर तिन वर्ष झाल्यानंतर त्यांचे कार्यासन/टेबल बदलण्यात यावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल च्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच 5 वर्षांनंतर एका विभागातून अन्य विभागात स्थानांतरण करण्यात यावे. याबाबतचे अधिकार अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.तसेच संदर्भीय शासन निर्णयातील अ.क्र.3 नुसार बदलीसंबंधाने कोणत्याही प्रकारची अनियमीतता होऊ नये याबाबत विभागीय आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. विहित पध्दती नुसार प्रशासकीय बदल्या करणे आवश्यक आहे.अन्यथा कसूर करणारा अधिकारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील.
बदल्यां बाबतच्या अनियमीततेची तक्रार प्राप्त झाल्यास त्याअनुषंगाने अनियमितता दूर करण्याच्या व अनियमिततेस जवाबदार असणाऱ्या विरुध्द नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही विभागीय आयुक्त यांनी करावी.शासन निर्णयामध्ये वरीलप्रमाणे नमुद केलेले असतांनासुध्दा शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद हिंगोलीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची कालावधी 8 ते 10 वर्षे पुर्ण झालेली असतांना आर्थिक गैरव्यवहाराच्या जोरावर संबंधित कर्मचारी हे मक्तेदारी असल्याप्रमाणे एकाच टेबलावर/कार्यासनामध्ये कार्यरत आहेत. सदर कर्मचारी व अधिकारी यांनी संस्थाचालक, मुख्याध्यापक व संघटनेचे पदाधिकारी यांना हाताशी धरुन आर्थिक गैरव्यवहाराच्या जोरावर अनेक अनियमीत कामे करुन, विवीध शासन नियमाची व RTE कायद्याची पायमल्ली करत विविध शासकीय योजनांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार करुन शासनाचे कोट्यावधीचा नुकसान करत मोठ्या प्रमाणावर चल अचल संपत्ती जमा केलेली आहे.
या सर्व प्रकरणाची उच्चस्थरीय चौकशी करुन माहिती अधिकारात प्राप्त माहितीनुसार शिक्षण विभागा मध्ये मागील अनेक वर्षापासुन ठाम मांडुन बसलेले खालील कर्मचारी व अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. सर्व कर्मचाऱ्यांची आपल्या स्तरावर बदली करावी.
त्याचप्रमाणे माहिती अधिकारात प्राप्त माहिती नुसार अनेक अनियमीत कामामध्ये कर्तव्यात कसुर करणारे व यासंबंधाने अनेकवेळा कारणे दाखवा नोटीस प्राप्त होऊनही वरिष्ठांची सतत अवमानना करणारे भ्रष्ट्राचारी संदिपकुमार एस.सोनटक्के, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद हिंगोली यांनी मोठ्या प्रमाणावर जमा केलेल्या चल अचल संपत्तीची व भ्रष्ट्राचाराची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची शासनास शिफारस करावी.
बदली प्राप्त कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली न केल्यास याविरुध्द वरिष्ठांकडे व उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादमध्ये याचिका दाखल करुन न्याय मागण्यात येईल असे निवेदन अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव,सचिव,ग्रामविकास विभाग,विभागीय आयुक्त औरंगाबाद, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. ईतराना देऊन मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल,राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम यांच्या सह्या आहेत, असे शेख नौमान नवेद नईम राष्ट्रीय संचालक तथा प्रसिद्धी प्रमुख यांनी कळविले आहे.