मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हिंगोली जिल्हा प्रशासनातर्फे 14 ऑगस्ट रोजी तिरंगा सायकल राईड काढण्यात आली. या राईड मध्ये सेनगाव येथील गोविंद शिंदे या यांनी निर्धारित वेळेच्या पंधरा मिनिट आधीच येऊन ही राईड जिंकली. त्यांच्या या कामगिरीने सेनगाव चे नाव उंचावले असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा होत आहे. हिंगोली जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविले जात असून नागरिकांत जनजागृती होण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.
हिंगोली जिल्हा प्रशासनाच्यावतीने 14 ऑगस्ट रोजी भारतीय ध्वजास सोबत 75 किलोमीटर तिरंगा सायकल राईड काढण्यात आली. या तिरंगा सायकल राईड मध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह प्रशासनातील सर्वच अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
सदरील गाईडला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला 75 किलोमीटरची तिरंगा सायकल राइड सेनगाव येथील गोविंद शिंदे यांनी निर्धारित वेळेच्या पंधरा मिनिटे आधी येऊन जिंकली. त्यांनी 75 किमीचे अंतर अवघ्या 2 तास 10 मिनिटात पूर्ण केले त्यांच्या या कामगिरीने जिल्ह्यात सेनगावचे नाव उंचावले असून गोविंद शिंदे यांचे जिल्हाभरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
या तिरंगा सायकल राईड मध्ये जवळपास दोनशे स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हि सहभाग नोंदविला.
गोविंद शिंदे ‘आयर्नमॅन’
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हिंगोली जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय ध्वज यासोबत 75 किलोमीटर तिरंगा सायकल राईड जिंकणारे सेनगाव येथील गोविंद शिंदे यांची सेनगाव पोलीस ठाण्यात बक्कल क्रमांक 213 या पदावर नेमणूक आहे. त्यांना सेनगाव शहरात तसेच तालुका घरात आयर्न मॅन म्हणूनही ओळखले जाते.