मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील पूर येथील ग्रामसेवक सूर्यकांत शंकरराव खाडे याने तक्रारदार यांच्याकडून जलजीवन अंतर्गत केलेल्या कामाचे हस्तांतर करून घेऊन कामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी व नळ जोडणीच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी 1 लाख 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील पूर येथील तक्रारदार यांचे जलजीवन मिशन अंतर्गत केलेले काम हस्तांतर करून घेऊन कामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी व नळ जोडणीच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी पूर ग्रामपंचायत ग्रामसेवक सूर्यकांत शंकरराव खाडे (वय 50 वर्ष, रा. ओमकार बिल्डिंगच्या बाजूला भार्गव क्लासेस जवळ, तोष्णीवाल यांच्या घरी,
मगनपुरा ता. जि. नांदेड मुळगाव नागलगाव ता. कंधार जि. नांदेड, हं. मु. वैष्णवी नगर खटकाळी बायपास हिंगोली) याने तक्रारदार यास पंचासमक्ष 1 लाख 15 हजार रुपये लाचेची मागणी केली व तडजोडी अंतिम 1 लाख 5 हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ग्रामसेवक सूर्यकांत खाडे यास ताब्यात घेण्यात आले असून कुरुंदा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरील सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड परिक्षेत्र पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी अनिल कटके (पोलीस उपाधीक्षक लाचरुचपत विभाग हिंगोली), पोलीस उपाधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युनूस शेख, विजय शुक्ला, पोह रवींद्र वरणे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंढे, गजानन पवार, गोविंद शिंदे, भगवान मंडलिक, चापोह अकबर, मपोना योगिता अवचार, पोलीस कॉन्स्टेबल राजाराम फुपाटे, शिवाजी वाघ, सर्व लाचरूपत विभाग हिंगोली यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर हे करत आहेत.